शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना लेबल बघावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:44 AM2019-06-05T00:44:04+5:302019-06-05T00:44:48+5:30
बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांनी लेबर पाहून खरेदी करावी, तसेच दुकानदाराकडून पावती घ्यावी, असे आवाहन चिमूर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी शिवाजी टाकरस यांनी केले आहे. खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी शेतकरी करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खडसंगी : बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांनी लेबर पाहून खरेदी करावी, तसेच दुकानदाराकडून पावती घ्यावी, असे आवाहन चिमूर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी शिवाजी टाकरस यांनी केले आहे.
खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी शेतकरी करीत आहेत. त्यासाठी बी- बियाणे खरेदीसाठी शेतकºयांची धावपळ सुरु झाली आहे. मात्र बियाणे व खत खरेदी करताना शेतकºयांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. अनेक ठिकाणी कृषी विभागाने बोगस बियाणे जप्त केले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी खत व बियाणे खरेदी करताना जागृत असणे गरजेचे आहे. शेतकºयांनी बियाणे घेताना लेबल पाहूनच बियाणांची खरेदी करावी, खरेदी केलेल्या बियाण्याचे अधिकृत बील घ्यावे, खताची खरेदी ई-पॉश मशिनमध्ये थम देऊन व नोंदणी करून घ्यावी. बियाने व खताचे वजन तपासून घ्यावे. या सोबतच कृषी निविष्ठा धारकांनी शेतकºयांना प्रत्येक मालाचे बिल द्यावे, यामुळे आपली फसवणूक होणार नाही. जर झालीच तर संबंधित दुकानावर कारवाई करता येईल, असे आवाहन चिमूर पंचायत समितीने केले आहे.