शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:45 PM2018-08-22T22:45:04+5:302018-08-22T22:45:51+5:30
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे बरेच नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून विमा अर्ज व रक्कम भरलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी या काळामध्ये तातडीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी किंवा संबंधित पिक विमा कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय पाटील यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे बरेच नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून विमा अर्ज व रक्कम भरलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी या काळामध्ये तातडीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी किंवा संबंधित पिक विमा कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय पाटील यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील खरीप हंगाम २०१८ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील मुद्दा क्रमांक १०.५ मधील जलमय झालेल्या क्षेत्रातील नुकसानीच्या तरतुदीनुसार विमा देय आहे. विमा संरक्षित क्षेत्र जलमय होऊन नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी पात्र ठरू शकतात. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जाहीर केल्या जाणाऱ्या नुकसानीच्या अधिसूचनेच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी विमा हप्ता रक्कम भरली आहे, किंवा ज्यांच्या खात्यातून विमा हप्ता रक्कम अदा करण्यात आलेली आहे, अशा शेतकरी बांधवांनी शासन निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही उदय पाटील यांनी केलेले आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील कृषी व महसूल यंत्रणेने सतर्कतेने या योजनेचा लाभ मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील व अन्य कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचाºयांनी घटना घडल्यापासून ४८ ताससांच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी किंवा विमा कंपनीचे जिल्हा व तालुकास्तरावरील प्रतिनिधी यांना देणे आवश्यक आहे. १८००२६६९७२५ टोल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांनी माहिती दिल्यास त्यांचा दावा ग्राह्य धरल्या जाऊ शकतो. यासाठी प्रयत्न करण्याबाबतही सतर्क राहण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व कृषी यंत्रणेला दिलेले आहेत.