शेतकऱ्यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:22 AM2021-05-29T04:22:22+5:302021-05-29T04:22:22+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी मधील तरतुदीनुसार शेतकऱ्यांच्या शेतावर, बांधावर व पडीत शेतजमिनीवर फळबाग लागवड कार्यक्रम कृषी व ...

Farmers should take advantage of the orchard scheme | शेतकऱ्यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा

शेतकऱ्यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा

Next

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी मधील तरतुदीनुसार शेतकऱ्यांच्या शेतावर, बांधावर व पडीत शेतजमिनीवर फळबाग लागवड कार्यक्रम कृषी व फलोत्पादन विभागामार्फत हाती घेण्यात आलेला आहे. चंद्रपूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. १ जून २१ ते ३० ऑक्टोबर २१ पर्यंत फळ लागवडीची मुदत आहे. या योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचे प्रशासनाने वेळापत्रक निश्चित केले आहे. २९ ते ३१ मे पर्यंत ग्रामपंचायत स्तरावर फळबाग योजनेची जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर व पडीत जागेवर कोरडवाहू फळ वृक्ष म्हणून आंबा, काजू, बोर, सीताफळ ,आवळा ,चिंच ,कवठ ,जांभूळ ,कोकम ,फणस, बांबू ,करंज ,नारळ, पेरू ,लिंबू साग ,गिरीपुष्प ,सोनचाफा, कडीपत्ता ,कडूलिंब, सिंधी, शेवगा ,चिंच ,कवठ ,जट्रोफा व इतर औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे.

संबंधित लाभार्थ्यांना ठराविक नमुन्यात अर्ज करायचा आहे.अर्ज ग्रामसेवकांकडे उपलब्ध आहे अर्जासोबत शेतीचा सातबारा, आठ अ जातीचा दाखला ,नरेगा जॉब कार्ड, आधार कार्ड, सातबारा एकापेक्षा अधिक सहधारक असल्यास त्याचे संमतीपत्र इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

Web Title: Farmers should take advantage of the orchard scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.