शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 11:41 PM2018-05-06T23:41:53+5:302018-05-06T23:41:53+5:30
माणसाला जगण्याकरिता लागणाऱ्या गरजांपैकी एक वस्तू भाजीपाला. शेतकऱ्यांनी रसायनयुक्त खताचा वापर न करता सेंद्रिय शेतीकडे वळावे, रसायनयुक्त खतामुळे होणारे दुष्पपरिणाम आणि त्यातून होणारे आजार मानवाच्या जीवावर बेतले आहे. कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : माणसाला जगण्याकरिता लागणाऱ्या गरजांपैकी एक वस्तू भाजीपाला. शेतकऱ्यांनी रसायनयुक्त खताचा वापर न करता सेंद्रिय शेतीकडे वळावे, रसायनयुक्त खतामुळे होणारे दुष्पपरिणाम आणि त्यातून होणारे आजार मानवाच्या जीवावर बेतले आहे. कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. पूर्वी सेंद्रिय शेतीकडे जास्त भर द्यायचे. पण आज याकडे दुर्लक्ष होत आहे. आज शेतकरी सर्वत्र रसायनयुक्त खते व औषधांचा वापर करीत असल्यामुळे याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत आहे. म्हणूनच शेतकºयांनी सेंद्रिय शेतीकडे ध्यान केंद्रित करून सेंद्रिय शेती करावी, असे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अॅड. संजय धोटे यांनी केले.
जिवती तालुक्यातील पांढरवाणी येथे आयोजित सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिर व ग्रामस्वराज अभिमान यात्रेच्या समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य सेंद्रिय शेती गट, राणी दुर्गावती महिला मंडळ व समस्त गावकºयांच्या वतीने करण्यात आले होते.
ग्रामस्वराज अभिमान यात्रेचे आयोजन ११ एप्रिल २०१८ ते ५ मे २०१८ यादरम्यान करण्यात आले होते. राज्य व केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यत पोहचवण्याकरिता हे अभियान राबविण्यात आले. महिला बचतगटाच्या माध्यमातून सरकारच्या योजनेचा लाभ कसा मिळेल. तसेच महिलांना चुलीपासून मुक्ती मिळण्याकरिता उज्ज्वला गॅस योजनेची माहिती प्रत्येक महिलांपर्यंत पोहचविणे, अदिवासी महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, यासाठी सदर अभियान राबविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सरकारच्या विविध योजनेची माहिती दिली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे सभापती सुनील मडावी, भाजपा तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी, भाजपा तालुका महामंत्री सुरेश केंद्रे, नानाजी बिरादार, कर्णू दुर्गे, अनिता दुर्वे, भाजयुमो तालुका महामंत्री रवी बुरडकर, जागुराम दुर्गे, बालाजी भुते, श्यामराव गेडाम, गोपीनाथ चव्हाण, लक्ष्मण बिरादार, अंकुश येमले, संभा पेंदोर, माणिक पेंदोर, भीमराव जुमनाके,सोयाबाई बिरादरी यावेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी गावातील महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.