विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकरी पुत्राचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 06:37 PM2021-12-30T18:37:21+5:302021-12-30T18:39:52+5:30
गुरुवारी रोशन हा शेतातील मुंगाला खत मारत होता. दरम्यान, पावसाने तुटल्यामुळे पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श त्याच्या पायाला झाला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
चंद्रपूर : शेतात खत मारत असताना पावसाने तुटून शेतात पडलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चिमूर तालुक्यातील मांगलगाव येथे गुरुवारी घडली. रोशन श्रीहरी ढोणे (२४, रा. मांगलगाव) असे मृत मुलाचे नाव आहे.
मागील दोन दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पाऊस पडला आहे. गुरुवारी रोशन हा शेतातील मुंगाला खत मारत होता. दरम्यान, पावसाने तुटल्यामुळे पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श त्याच्या पायाला झाला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच भिसी पोलीस, वीज कंपनीचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी हजर झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
दरम्यान, अवकाळी पाऊस व गारपिटिने पूर्व विदर्भात पिकांचे मोठे नुकसा झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तळोधी बा. परिसरात पावसामुळे विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आणलेले खुल्या आवारात असलेली धानाची पोती भिजली, असून आता करावे तरी काय, अशी परिस्थिती शेतकऱ्यांपुढे उभी ठाकली आहे.