शेतकऱ्यांनो, करडई पेरा आणि एकरी २२०० रुपये मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 05:00 AM2021-10-29T05:00:00+5:302021-10-29T05:00:38+5:30

करडईचे क्षेत्र विस्तारणार आहे. बियाणासाठी जिल्ह्यातील तब्बल १ हजार ८०० शेतकऱ्यांची नोंदणी केली.राज्यात तेलाचे उत्पादन कमी असल्याने ही गरज भागविण्यासाठी खाद्यतेल आयात केले जाते. विदर्भातील अन्य जिल्ह्यात करडई तेलबिया पिकाचे क्षेत्र कमी होत असताना यंदा जिल्ह्यात लागवड क्षेत्र वाढणार आहे. हे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने कृषी विद्यापीठांनी करडई पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर देणे सुरू केले. या वर्षी पाऊस चांगला पडल्याने शेतकऱ्यांचा कल करडईकडे वाढला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी करडई पेरणीकडे पाठ फिरविली.

Farmers, sow safflower and get Rs. 2200 per acre | शेतकऱ्यांनो, करडई पेरा आणि एकरी २२०० रुपये मिळवा

शेतकऱ्यांनो, करडई पेरा आणि एकरी २२०० रुपये मिळवा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : करडईत पोषकद्रव्ये अधिक आहेत. शिवाय कमी खर्चात हे पीक होत असून, सध्या दरही चांगला मिळत असताना यंदा रब्बी हंगामात महाज्योती अभियानांतर्गत शेतकऱ्यांना बियाणे देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ओबीसी, व्हीजीएनटी, एसबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांना करडई लागवडीसाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून प्रति एकर २२०० रुपये मिळणार आहेत.
करडईचे क्षेत्र विस्तारणार आहे. बियाणासाठी जिल्ह्यातील तब्बल १ हजार ८०० शेतकऱ्यांची नोंदणी केली.राज्यात तेलाचे उत्पादन कमी असल्याने ही गरज भागविण्यासाठी खाद्यतेल आयात केले जाते. विदर्भातील अन्य जिल्ह्यात करडई तेलबिया पिकाचे क्षेत्र कमी होत असताना यंदा जिल्ह्यात लागवड क्षेत्र वाढणार आहे. हे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने कृषी विद्यापीठांनी करडई पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर देणे सुरू केले. या वर्षी पाऊस चांगला पडल्याने शेतकऱ्यांचा कल करडईकडे वाढला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी करडई पेरणीकडे पाठ फिरविली. हे पीक काटेरी असल्याने काढण्यासाठी मजूर मिळत नाहीत. हलक्या जमिनीत करडईची लागवड करता येते. करडईचे पीक एकाच जमिनीत सलग घेतले जाते. स्थानिक वाणांचा वापर, संकरित व सुधारित वाणांचे बियाणे सहज उपलब्ध न होणे, मावा किडीचे तसेच मर व करपा रोगाचे नियंत्रण वेळेवर न होणे, करडईची पेरणी उशिरा किंवा लवकर करणे, मजुरांचा अभाव बाजारभावातील लवचिकतेचा अभाव या कारणामुळे लागवड क्षेत्र घटले होते.

महाज्योती अभियानाचा आधार
करडईची पेरणी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली असता रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान होते तर उशिरा म्हणजे ऑक्टोबरनंतर झाल्यास पिकाची कोवळी अवस्था थंडीत येऊन मावा कीड येते. करडईची पेरणी सप्टेंबरचा दुसरा पंधरवडा ते ऑक्टोबरच्या लागवडीसाठी करडईचे सुधारित वाणाचे प्रमाणित बियाणे निवडावे लागते.  महाज्योती अभियानाकडून शेतकऱ्यांना करडई लागवडीसाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून आधार मदत देण्यात येणार आहे. कृषी विभागाने पीडीकेव्ही पिंक, पीबीएनएस ८६, एकेएस २०७ आदी करडईचे बियाणे तातडीने पुरविण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

जिल्ह्यातील जमीन पोषक
- करडई पिकासाठी मध्यम ते खोल भारी जमीन निवडावी. ६० सें.मी.पेक्षा जास्त खोल जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो. त्यामुळे करडई पीक चांगले येते. जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. पाणी साठून राहिल्यास पिकास अपाय होतो. करडई पीक काहीशा चोपण जमिनीतही होते. शेतकरी आता अधिक उत्पादन व अधिक फायदा मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. सध्या करडईला चांगला बाजारभाव आहे.

कोणाला मिळणार योजनेचा लाभ?

करडई बियाणे पेरणी करणाऱ्या ओबीसी, व्हीजीएनटी, एसबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांना करडई लागवडीसाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून प्रति एकर २२०० रुपये मिळणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ८०० शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याचे समजते.

 

Web Title: Farmers, sow safflower and get Rs. 2200 per acre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती