शेतकऱ्यांचा पाटबंधारे कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:09 PM2018-05-22T23:09:08+5:302018-05-22T23:09:08+5:30

सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील मामा तलावावरील वेस्टवेअरची उंची वाढविल्यामुळे परिसरातील ५० एकर शेती पाण्यात जाणार आहे. त्यामुळे धानउत्पादकांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे वेस्टवेअरची उंची त्वरित कमी करावी, या मागणीसाठी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी चंद्रपूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयात ठिय्या मांडला.

Farmers stopping at the irrigation office | शेतकऱ्यांचा पाटबंधारे कार्यालयात ठिय्या

शेतकऱ्यांचा पाटबंधारे कार्यालयात ठिय्या

Next
ठळक मुद्देवेस्टवेअरची उंची कमी करा : उपविभागीय अभियंत्यांना घेराव

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील मामा तलावावरील वेस्टवेअरची उंची वाढविल्यामुळे परिसरातील ५० एकर शेती पाण्यात जाणार आहे. त्यामुळे धानउत्पादकांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे वेस्टवेअरची उंची त्वरित कमी करावी, या मागणीसाठी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी चंद्रपूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयात ठिय्या मांडला.
सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे मामा तलाव आहे. येथील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी वेस्टवेअरचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यात लगतचे शेत संपूर्ण पाण्याखाली जाते. त्यावर धानपिकाची शेती करणे अत्यंत कठीण होते. मात्र या शेतकºयांना अद्याप याचा मोबदला मिळालेला नाही. त्यातच काही दिवसांपूर्वी या शेतकºयांना कुठलीही पूर्वसूचना न देता वेस्टवेअरची उंची वाढविण्यात आली. त्यामुळे शेतीचे नुकसान वाढले असून जवळपास ५० एकर शेती पाण्याखाली जाणार असे शेतकºयांचे म्हणणे आहे. शेतीच्या भरोशावर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.
त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट चंद्रपूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयात धडकले. यावेळी त्यांनी उपविभागीय अभियंता विनोद घंगारे यांना घेराव घातला. विभागाकडून निव्वळ पिकाची नुकसान भरपाई दिली जाते. ही जमीन संपादित करून त्याचा पूर्ण मोबदला आम्हाला देण्यात यावा, अतिरिक्त बांधकाम त्वरित काढण्यात यावे, अन्यथा आम्हीच पर्यायी व्यवस्था करू, असा इशाराही यावेळी शेतकºयांनी दिला. यावेळी आक्रोश खोब्रागडे, गुरुदास मेश्राम, रघुनाथ बन्सोड, रवींद्र बोडेवार, किसन बोरकर, प्रभाकर बोरकर आदी उपस्थित होते.

Web Title: Farmers stopping at the irrigation office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.