वेकोलिविरोधात शेतकरी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:52 AM2018-03-16T00:52:50+5:302018-03-16T00:52:50+5:30
वेकालिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या कोळसा खाण परिसरातील नाला वळविण्यासाठी खाणीतून निघणाºया मातीचे ढिगारे उभे केले जात आहे. आधीच या ढिगाऱ्यामुळे वर्धा नदीला येणाऱ्या पुरामुळे सास्ती गावाला धोका निर्माण होत असतानाच ....
ऑनलाईन लोकमत
सास्ती : वेकालिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या कोळसा खाण परिसरातील नाला वळविण्यासाठी खाणीतून निघणाºया मातीचे ढिगारे उभे केले जात आहे. आधीच या ढिगाऱ्यामुळे वर्धा नदीला येणाऱ्या पुरामुळे सास्ती गावाला धोका निर्माण होत असतानाच पुन्हा नाला वळविण्याने भविष्यात कृत्रिम पुरस्थिती निर्माण होऊन सास्ती गावासोबतच रामनगर, कोलगाव, मानोली व बाबापूर या गावांना मोठा फटका बसणार आहे. याची कल्पना आल्याने येथील शेतकऱ्यांनी नाला वळविण्याच्या व मातीचे ढिगारे उभे करण्याविरोधात शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटिका विजयालक्ष्मी रोंगे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.
सास्ती खुल्या कोळसा खाणीतील माती उत्खनन केल्यानंतर ती टाकण्यासाठी वेकोलिने सास्ती गावाजवळ अधिग्रहीत केलेल्या जमिनीवर टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कामही सुरु केले. परंतु, या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे वर्धा नदीला येणाºया पुरात सास्ती गावातील अनेक घरात पाणी शिरत होते. आता सास्ती शेजारच्या मोठा नाला आपल्या सोईनुसार वळविण्याचे काम वेकोलिने हाती घेतले. त्यामुळे भविष्यात कृत्रीम पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सास्ती सोबतच रामनगर, कोलगाव, मानोली व बाबापूर या गावांना सुद्धा पुराचा धोका निर्माण होऊन परिसरातील शेती पाण्याखाली येवू शकते. यातून मोठे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहे.
त्यामुळे शिवसेनेच्या विजयालक्ष्मी रोंगे यांनी नाला वळविण्याचे काम बंद करण्याबाबतचे निवेदन वेकोलि व जिल्हा प्रशासनाला दिले होते. परंतु यावर कोणताही तोडगा न निघाल्यामुळे गुरूवारी सकाळी ११ वाजता सास्ती चेकपोस्ट वरुन कार्य सुरु असण्याच्या ठिकाणापर्यंत शेतकऱ्यांनी मोर्चा काढला.
याप्रसंगी शिवसेना राजुरा शहर प्रमुख आदित्य भाके, शिवसेना उपतालुका प्रमुख विनोद कावळे, प्रदीप रोगे, यशवंत लांडे, सतिश बोबडे, राहुल काळे, मोहन काळे, भास्कर चौधरी, रवींद्र बोबडे, प्रशांत भोंगळे, सोनु निब्रड, सचिन लांडे, रुपेश नक्षिणे, बबन लांडे, प्रकाश रोगे, ओम काळे यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील शेतकरी व गावकरी उपस्थित होते. यावेळी वेकोलिच्या सास्ती खाणीचे व्यवस्थापन रविंद्र ठुणे व क्षेत्रीय नियोजन अधिकारी पुलय्या यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. येत्या १७ मार्चला वेकोलिच्या वरिष्ठांशी बैठकीचे आयोजन करुन शिष्टमंडळाच्या वतीने मांडलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीत तोडगा न निघाल्यास शिवसेनेच्या वतीने मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.