पीक विम्यासाठी शेतकरी करणार सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:33 AM2021-09-17T04:33:17+5:302021-09-17T04:33:17+5:30

सिंदेवाही : तालुक्यातील ...

Farmers will do satyagraha for crop insurance | पीक विम्यासाठी शेतकरी करणार सत्याग्रह

पीक विम्यासाठी शेतकरी करणार सत्याग्रह

Next

सिंदेवाही : तालुक्यातील पीक विमाधारक नुकसानग्रस्त शेतकरी, शेतमजूर महासंघ आपल्या मागण्यांकरिता २२ सप्टेंबर रोजी सिंदेवाही येथील पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करणार आहेत.

शेतकरी, शेतमजूर महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुदेव सेवा मंडळ येथे सभा झाली. सन २०२०-२१च्या खरीप धान पीक हंगामात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांनी कृषी कार्यालय, तहसीलदार, तलाठी यांच्याकडे तक्रार अर्ज केले आहेत. परंतु, आदेश नसल्याने कोणाचेही तक्रार अर्ज घेण्यात आले नसल्याची चर्चा सभेमध्ये करण्यात आली. या व इतर अनेक मागण्यांसाठी २२ सप्टेंबरला सत्याग्रह आंदोलन करण्याचा निर्णय या सभेमध्ये घेण्यात आला.

160921\img-20210915-wa0052.jpg

पिक विम्यासाठी शेतकरी सत्याग्रह आंदोलन करणार असल्याने सभेचे आयोजन

Web Title: Farmers will do satyagraha for crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.