गडचांदुरात शेतकरी, कामगारांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 11:36 PM2018-04-04T23:36:27+5:302018-04-04T23:36:27+5:30

राज्यात शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कामगारांच्या सुद्धा ज्वलंत समस्या असून शेकडो कामगारांना कामावरून काढून टाकले जात असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे.

Farmers, workers dam in Gadchandur | गडचांदुरात शेतकरी, कामगारांचे धरणे

गडचांदुरात शेतकरी, कामगारांचे धरणे

Next
ठळक मुद्देनरेश पुगलिया : प्रलंबित मागण्यांसाठी एकत्र लढा उभारण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : राज्यात शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कामगारांच्या सुद्धा ज्वलंत समस्या असून शेकडो कामगारांना कामावरून काढून टाकले जात असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकरी व कामगारांनी एकत्र येऊन न्याय हक्कासाठी लढणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कामगार नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले.
गडचांदूर येथील राजीव गांधी (पेट्रोल पंप) चौकात शेतकरी व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे गजानन गावंडे, गोदरू पाटील जुमनाके, अविनाश जाधव, विनोद अहिरकर, शिवचंद्र काळे, नासीर खान, अ‍ॅड. मेघा भाले, तारासिंग कलशी, देवेंद्र गहलोत, प्रवीण पडवेकर, अ‍ॅड. अरुण धोटे, हंसराज चौधरी, विजय ठाकुरवार, सागर ठाकुरवार, अशोक नागापुरे, वहाब भाई, सरपंच विठ्ठल टोंगे, उपसरपंच अनिल गिरीले आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या शेतकरी व कामगार धोरणावर टिका केला. सध्याचे मोदी व फडणवीस सरकार शेतकरी व कामगार तसेच सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत केला.
चंद्रपूर जिल्ह्यात बारामाही नद्या असताना सिंचनाच्या दृष्टीने बंधारे नाही, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन कामगार नेते साईनाथ बुचे यांनी केले. आभार अजय मानवटकर यांनी मानले. याप्रसंगी जिवती, कोरपना, राजुरा तालुक्यातील शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Farmers, workers dam in Gadchandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.