वेकोलिच्या ओव्हरबर्डनने होतोय शेतीचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 11:38 PM2017-09-05T23:38:37+5:302017-09-05T23:39:03+5:30

वेकोलिने कोळसा उत्खननानंतर मातीचे ओव्हरबर्डन तयार केले. या ओव्हरबर्डनवर काटेरी झुडूपांनी अतिक्रमण केल्याने या ठिकाणी जंगली स्वापदांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे.

 The farming power of Wicklow's overburden | वेकोलिच्या ओव्हरबर्डनने होतोय शेतीचा घात

वेकोलिच्या ओव्हरबर्डनने होतोय शेतीचा घात

Next
ठळक मुद्देशेतपिकांचे नुकसान : कोळसा खाणीलगतच्या शेतीची नासधूस

प्रकाश काळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : वेकोलिने कोळसा उत्खननानंतर मातीचे ओव्हरबर्डन तयार केले. या ओव्हरबर्डनवर काटेरी झुडूपांनी अतिक्रमण केल्याने या ठिकाणी जंगली स्वापदांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. गोवरी, पोवनी, साखरी, सास्ती, कोळसा खाण परिसरातील शेतीची भरदिवसा नासधूस करण्यात येत आहे.
अनेकदा मातीचे ढिगारे हटविण्याची मागणी शेतकºयांनी केली. मात्र वेकोलिच्या मुजोर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतातील फळधारणेवर आलेले उभे पीक उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे वेकोलिच्या ओव्हरबर्डनने शेतीची पूर्णत: वाट लागली आहे. वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाºया राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी आहेत. गोवरी, सास्ती, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी वेकोलिच्या कोळसा खाणींनी व्यापला आहे. वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीत कोळसा उत्खननासाठी मातीचे महाकाय ढिगारे वेकोलिने परिसरात टाकले. मातीच्या ढिगाºयालगत शेती आहे.
सध्या शेतपीक फळधारणेवर आले आहे. मातीच्या ढिगाºयावर वाढलेल्या काटेरी झुडुपात रानडुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. या परिसरात शेडी प्राण्यांची संख्या मोठी आहे. वन्यप्राण्यांकडून शेतकºयांच्या डोळ्यादेखत पिकांची नासधूस करण्यात येत आहे. दिवस-रात्र काबाडकष्ट करून मोठ्या मेहनतीने शेतकºयांनी उभे केलेले पीक क्षणार्धात वन्यप्राणी उद्ध्वस्त करीत आहे. वेकोलिचे मातीचे ढिगारे आणि वन्यप्राणी हे दुहेरी संकट शेतकºयांवर आहे. अस्मानी आणि सुल्तानी संकटाचा फ टका नेहमीच शेतकºयांना बसत आला आहे.
शेतकºयांसाठी संकटांची मालिकाच सुरू असून यातून शेतकºयांची सुटका होणे मोठे कठीण झाले आहे. उसनवारी व कर्ज काढून शेतकºयांनी पिकांची जोपासना करायची व वन्यप्राण्यांनी पीक उध्वस्त करायचे, यात शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.
शेतकरी वेकोलि आणि वनविभागाच्या कचाट्यात
वेकोलि मातीचे ढिगारे हटवत नाही आणि वनविभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करीत नाही. खरे तर वन्यप्राणयांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. परंतु, वनविभागाचे कर्तव्यदक्ष समजले जाणारे अधिकारी करतात तरी काय ? हा प्रश्नच आहे. त्यामुळे वेकोलि व वनविभागाच्या कचाट्यात शेतकरी सापडला आहे.
 

Web Title:  The farming power of Wicklow's overburden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.