मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे; २ जानेवारीपासून आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:14 IST2025-01-30T14:05:46+5:302025-01-30T14:14:39+5:30
Chandrapur : मध्यवर्ती सहकारी बँक नोकरभरती प्रकरण

Fast-tracked after Chief Minister's assurance; Protest from January 2
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकरभरतीत मागासवर्गीयांचे हक्काचे आरक्षण हिरावण्यात आल्याचा आरोप करत आरक्षण बचाव संघर्ष समितीने प्रथम ठिय्या त्यानंतर आमरण उपोषण सुरू केले होते. मनोज पोतराजे आणि रमेश काळबांधे हे उपोषणाला बसले होते. दरम्यान, २९ जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी लावू, एकाही दोषीला सोडले जाणार नाही. यासंदर्भात लेखी आदेश दोन दिवसात निघेल, असे आश्वासन फोनवरून दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. २७ जानेवारीला आरक्षण बचाव संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चौकशी करण्याची मागणी केली.
मुंडन आंदोलन, चौदवी
आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून मुंडन आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान, बुधवारी शेवटच्या दिवशी समितीच्या सदस्यांनी चौदवीचा कार्यक्रम घेत निषेध नोंदवला.
२ जानेवारीपासून आंदोलन
माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. २ जानेवारीपासून आंदोलन सुरु करण्यात आले होते.