वृद्ध पेन्शनधारकांचे कुटुंबीयांसोबत उपवास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:41+5:302021-06-03T04:20:41+5:30

पंतप्रधानाकडे उपोषणाचा फोटो पाठवून मागण्या माण्य करण्याची विनंती सास्ती : महागाईच्या काळात अल्पशा पेन्शनमुळे उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. ...

Fasting agitation with the families of the elderly pensioners | वृद्ध पेन्शनधारकांचे कुटुंबीयांसोबत उपवास आंदोलन

वृद्ध पेन्शनधारकांचे कुटुंबीयांसोबत उपवास आंदोलन

Next

पंतप्रधानाकडे उपोषणाचा फोटो पाठवून मागण्या माण्य करण्याची विनंती

सास्ती : महागाईच्या काळात अल्पशा पेन्शनमुळे उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अल्प पेन्शन, कुठलाही महागाई भत्ता नाही किंवा वैद्यकीय सुविधाही नाही, अशा परिस्थितीत सन्मानपूर्वक जगण्यास असमर्थ ठरत असलेल्या ईपीएस ९५ पेन्शनधारकांनी मागील अनेकरवर्षांपासून राष्ट्रीय संघर्ष समितीच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलने केली. परंतु न्याय मिळाला. नाही. अखेर देशातील ६७ लाख ईपीएस-९५ पेन्शनधारकांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत एक दिवसीय उपवास आंदोलन करीत आंदोलनाचा फोटो आपल्या क्षेत्राचे खासदार आणि देशाच्या पंतप्रधानांकडे इ-मेलच्या माध्यमातून पाठवित आपल्या भावना व्यक्त केल्या आणि मागण्या मान्य करण्याची विनंती केली.

देशातील विविध महामंडळ, खासगी उद्योग, सहकार क्षेत्रात काम केलेल्या सुमारे ६७ लाख ईपीएस ९५ पेन्शनधारकांना केवळ ३०० ते तीन हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळते. त्यावर कुठल्याही महागाई भत्ता नाही की वैद्यकीय सुविधा नाही. अशा स्थितीत सन्मानपूर्वक जगण्यास अडचण निर्माण होत आहे. ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात या पेन्शनधारकांनी विविध प्रकारची आंदोलने केली. समितीच्या मुख्यालयी बुलडाणा येथे मागील ८९१ दिवसांपासून साखळी उपोषणही सुरू आहे. मात्र आजपर्यंत या आंदोलनाची दखल सरकारकडून घेतल्या गेली नाही व पर्यायाने कोरोनाच्या या कठीण काळात अनेक पेन्शनधारक सन्मानजनक पेन्शनची वाट पाहत हे जगसुद्धा सोडून गेले. सरकारचे लक्ष वेधण्याचा आणखी एक प्रयत्न म्हणून मंगळवारी ईपीएस ९५ पेन्शनधारकांनी एक दिवसीय राष्ट्रव्यापी उपोषण कार्यक्रम हाती घेऊन देशातील ६७ लाख पेन्शनधारकांनी कुटुंबीयांसोबत आपापल्या घरी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपवास करत आंदोलन केले.

बॉक्स

शेकडो पेन्शनधारकांचा सहभाग

जिल्ह्यात शेकडो वृद्ध पेन्शनधारकांनी यात सहभागी होत एक दिवसीय उपवास आंदोलन करून आंदोलनाचा फोटो क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईमेलद्वारे पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आणि न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली. या आंदोलनात ईपीएस-१५ राष्ट्रीय संघर्ष समिती शाखा चंद्रपूरचे अध्यक्ष परशुराम तुंडुलवार, उपाध्यक्ष रामचंद्र मुसळे, सचिव दयाशंकर सिंग, पुंडलिक मोहुर्ले, सुभाष शहा, संदीप गड्डमवार, गुलाब ठाकरे, किशोर ठाकरे, मनोहर टाके, अरुण जमदाडे, महादेव परचाके, तुळशीराम बनवाडे, सय्यद अख्तर, कवडू डेरकर, अरुण लांडे, जगदीश भशाखेत्री, मधुकर वाहने, धनंजय दास यांच्यासह शेकडो पेन्शनधारकांनी सहभाग नोंदविला.

Web Title: Fasting agitation with the families of the elderly pensioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.