‘बदली हवी टीम’चे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:12 AM2017-11-23T00:12:38+5:302017-11-23T00:13:01+5:30
राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या परिपत्रकान्वये शिक्षक संवर्गाची बदली प्रक्रिया प्रशासनाने तत्काळ राबवावी, या मागणीसाठी ‘बदली हवी टीम’ तर्फे बुधवारी जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या परिपत्रकान्वये शिक्षक संवर्गाची बदली प्रक्रिया प्रशासनाने तत्काळ राबवावी, या मागणीसाठी ‘बदली हवी टीम’ तर्फे बुधवारी जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात बदलीपात्र जवळपास २०० शिक्षक सहभागी झाले होते.
राज्य शासनाने काढलेल्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार शिक्षक संवर्गाच्या बदली प्रक्रियेची सुरूवात मे २०१७ पासून करण्यात आली. परंतु शासन निर्णयाविरोधात काही शिक्षक न्यायालयात गेले. परंतु त्याच निर्णयानुसारच बदल्या करण्यास परवानगी दिली आहे. दिवाळी सुटयानंतर बदली प्रक्रिया राबविणे आवश्यक असताना प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रक्रिया पूर्ण केली नाही.
या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यास शासनाकडून विलंब होत असल्याने बदलीपात्र शिक्षकात रोष पसरला आहे. काही शिक्षक या निर्णयाविरोधात असल्याने न्यायालयात जावून खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अनेक वर्षांपासून दुर्गम भागात सेवा देणाºया शिक्षकांना २७ फेब्रुवारीचा शासन निर्णय दिलासा देणारा असल्याने या निर्णयानुसारच बदलीप्रक्रिया राबविण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.
या आंदोलनात बदली हवी टीमचे रवी सोयाम, लखन साखरे, योगेश रामटेके, चांगदेव पाझारे, नरेश बोरिकर, अतुल महाजन आदी शिक्षकांचा सहभाग होता. या आंदोलनाची दखल न घेतल्यास ४ ते ९ डिसेंबरला साखळी उपोषण करण्याचा इशारा बदली हवी टीमने दिला आहे.