विसापुरातील ३१५ कुटुंबातील लोकांचा जीवघेणा संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:01:29+5:30
याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये अक्रोषाचे वातावरण आहे. विसापूर गावातील लोकसंख्या १६ हजारांवर आहे. येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये सर्वाधिक लोकसंख्या रोजंदारी मजुरांची आहे़ अशातच याच वॉर्डातील २६ वर्षांच्या तरूणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला. कोरोनाबाधित तरूणाच्या कुटुंबातील सदस्य व अन्य एक कुटुंबातील सदस्यासह १३ जणांना चंद्रपूर येथे विलगीकरण करण्यासाठी हलविण्यात आले.
सुभाष भटवलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसापूर : जिल्ह्यातील विसापूर गावात २१ मे रोजी एक २६ वर्षाचा तरूण कोरोनाबाधित आला. यामुळे विसापूर येथील वॉर्ड क्रमांक ५ प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले. या क्षेत्रातील ९० टक्के मजूर वर्ग असून दररोज मिळणाऱ्या मिळकतीवर उदरनिर्वाह करतात. या भागात कोरोनाबाधित रूग्ण निघाल्याचा विपरित परिणाम झाला. विसापूर येथील कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्रातील ३१५ कुटुंबातील ११५० लोकांचा जीवघेणा संघर्ष सुरू झाला आहे.
याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये अक्रोषाचे वातावरण आहे. विसापूर गावातील लोकसंख्या १६ हजारांवर आहे. येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये सर्वाधिक लोकसंख्या रोजंदारी मजुरांची आहे़ अशातच याच वॉर्डातील २६ वर्षांच्या तरूणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला. कोरोनाबाधित तरूणाच्या कुटुंबातील सदस्य व अन्य एक कुटुंबातील सदस्यासह १३ जणांना चंद्रपूर येथे विलगीकरण करण्यासाठी हलविण्यात आले. यामुळे या भागातील नागरिकांवर उपासमारीचे जबरदस्त संकट ओढवले आहे. सदर प्रतिबंधात्मक क्षेत्रात जीवनाश्यक वस्तु मिळण्याचे नाममात्र दोन दुकाने असून तेदेखील बंद आहेत़ गावात इतर ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. परिणामी ३१५ कुटुंबातील ११५० सदस्यांना जीवघेण्या संघर्षाला तोंड देण्याची वेळ कोरोना संकटामुळे ओढवली आहे ़ लॉकडाऊनच्या तीन टप्प्यात काहिसा मोकळा श्वास घेणाºया नागरिकांना चवथ्या टप्प्यातील टाळेबंदीच्या काळात मोठा त्रासाला सामोरे जावे लागत आहे ़
विसापूर येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये कोरोनाबाधित रूग्ण आल्याने व या क्षेत्रातील अंतर्गत रस्ते व सीमाबंदी केल्यामुळे येथील ९० टक्के रोजंदारी मजुरांची जीवन जगण्यासाठी घालमेल सुरू झाली आहे.
कोरोना संकटापेक्षा उपासमारीने नागरिकांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक पातळीवर प्रशासन आजघडीला कोरोना संकट हाताळण्यावर भर देत असले तरी प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपाय योजना करण्याची गरज आहे़ भयभीत नागरिकांना उदरनिर्वाहासाठी साधन सामग्री उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी विसापूर येथील कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांनी केली आहे