रेल्वे बोगद्याखालून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:31 PM2019-04-27T23:31:19+5:302019-04-27T23:32:02+5:30

तालुक्यातील चिखली ते कन्हाळगाव दरम्यान रेल्वे बोगद्यांमध्ये अंधार राहत असल्याने नागरिकांना त्याखालून प्रवास करताना अडचणी येतात. गावांकडे जाण्यासाठी अन्य मार्ग नाही.

Fatal Travel Under Railway Board | रेल्वे बोगद्याखालून जीवघेणा प्रवास

रेल्वे बोगद्याखालून जीवघेणा प्रवास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : तालुक्यातील चिखली ते कन्हाळगाव दरम्यान रेल्वे बोगद्यांमध्ये अंधार राहत असल्याने नागरिकांना त्याखालून प्रवास करताना अडचणी येतात. गावांकडे जाण्यासाठी अन्य मार्ग नाही.
चिखलीपासून पूर्वेला ताडभुज, कन्हाळगाव मंदिर तर भसबोरन नावाचा मोठा तलाव व परिसरात शेती आहे. चिखली येथील नागरिक जनावरे चराईसाठी कन्हाळगाव जंगलात नेत असतात. कन्हाळगाव हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. बाहेरगावातील अनेक भाविक मंदिराकडे याच रस्त्याने जातात. याच रस्त्यावर गोंदिया-बल्लारपूर हा रेल्वे मार्ग आहे. काही वर्षांपूवी रेल्वे रूळावरूनच नागरिकांना दळणवळणाचा मार्ग होता. मात्र या रूळावर अनेक अपघात झाले. त्यामुळे सन २०१५ मध्ये रेल्वे प्रशासनाने अपघात कमी करण्यासाठी हा मार्ग बंद केला. त्यावर लाखो रूपये खर्च करून रेल्वे रूळाखाली सिमेंट काँक्रीटचा बोगदा तयार केला. परंतु संबंधित कंत्राटदारांने निकषांचे पालन केले नाही.

अपघाताचा धोका रेल्वे बोगद्यात दिवसदेखील अंधार असतो. पावसाळ्यात जोराचा पाणी आल्यास बोगद्यात चार ते पाच फुट पाणी साचून राहते. परिणामी गावाकडे जाण्याचा मार्गच बंद होतो. बोगद्यातून जात असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सर्वेक्षण करावे
चंद्रपूर-गोंदिया मार्गावरील रेल्वे रूळाच्या बाजूला शेकडो शेतकऱ्यांच्या शेती आहेत. रेल्वे प्रशासनाने अनेक ठिकाणी पूल बांधल्याने शेतीकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. पुलांखाली बोगदे तयार करण्यात आले. त्यांचे सर्वेक्षण करून उपाययोजनेची गरज आहे.

Web Title: Fatal Travel Under Railway Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे