शेतातील नाल्यातून पाणी भरताना विजेचा शॉक लागून वडील व मुलगी जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 02:02 PM2020-10-03T14:02:38+5:302020-10-03T14:03:07+5:30
Death, Chandrapur News शेतालागत असलेल्या नाल्यावर पाणी भरण्याकरिता गेले असलेल्या बाप लेकीला जिवंत विद्यूत शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राजुरा तालुक्यातील सिंधी शिवारात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: शेतालागत असलेल्या नाल्यावर पाणी भरण्याकरिता गेले असलेल्या बाप लेकीला जिवंत विद्यूत शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राजुरा तालुक्यातील सिंधी शिवारात घडली. स्वनिल सत्यपाल चाहारे (वय३२) तर सेजल स्वप्नील चाहारे (वय७ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. सदर मृतक हा आपल्या वडिलाला एकुलता एक होता तर मृतक मुलगी ही आई वडिलांना एकुलती एक असल्याने सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
यात सविस्तर असे की, स्वप्नील हा आपल्या वडिलांसोबत शेतात काम करण्याकरिता सिंधी शिवारात असलेल्याशेतात आला. कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्याने सोबत त्याची मुलगी सेजल हीसुद्धा सोबत आली होती.
शेतालगत नाला असल्याने सेजल ही पाणी पाहून खेळण्यासाठी पाण्यात उतरली असता तिला पाण्यात विद्युत प्रवाह सुरू असल्याने तिला शॉक लागून ती खाली पडली. दरम्यान मुलीला वाचविण्यासाठी गेलेल्या स्वप्नीललाही शॉक लागल्याने तो जागीच ठार झाला.
बराच वेळ होऊन परत आले नाही म्हणून स्वप्नीलचे वडील सत्यपाल हे घटनास्थळी आला असता दोघेही पाण्यात पडून दिसले. त्यांनीआरडाओरड केली असता बाजूच्या शेतातील नागरिकांनी येऊन मोटार पंपची वायर तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले.
या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.