चिंचेच्या फांद्या तोडण्यावरून बापलेकाने केली शेजाऱ्याची हत्या

By राजेश भोजेकर | Published: July 6, 2024 03:10 PM2024-07-06T15:10:21+5:302024-07-06T15:11:31+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील घटना : पोलिसांनी घेतले आरोपींना ताब्यात

father and son killed neighbor for cutting tree branches | चिंचेच्या फांद्या तोडण्यावरून बापलेकाने केली शेजाऱ्याची हत्या

father and son killed neighbor for cutting tree branches

भेजगाव : शुल्लक कारणावरून वाद झाल्याने बापलेकाने शेजाऱ्याच्या अंगावर धावून जात त्याच्या मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार करीत जागीच ठार केले. ही थरारक घटना मूल तालुक्यातील हळदी येथे शनिवारी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान घडली.

राजेश्वर शेषराव बोधलकर (37) असे मृतकाचे नाव आहे.  सुरज गुरुदास पिपरे (२२), गुरुदास नक्टु टिपरे ( 50 ), असे आरोपी बापलेकाची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुमित परतेकी ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेच्या अर्ध्या तासातच आरोपींना ताब्यात घेत त्यांना अटक केली आहे.
       

सविस्तर असे की, घराशेजारी असलेल्या माधव घोंगडे हा आपल्या ताब्यात असलेल्या चिंचेच्या झाडाच्या फांद्या घरावर गेल्याने त्या तोडत होता. दरम्यान, झाडे तोडताना विद्युत तारेचे नुकसान होऊ नये म्हणून सुरज आणि गुरुदास पिपरे यांनी विद्युत पुरवठा खंडित केला. झाडे तोडून झाल्यानंतर विद्युत पुरवठा सुरू करण्यापूर्वी पिपरे यांचे घर हे मुख्य खांबापासून लांब असल्याने विद्युत ताराला लाकडी बल्लीचा टेकू लावला होता. मात्र पिपरे बापलेकाने विद्युत पुरवठा सुरू करताना ती लाकडी बल्ली जुन्याच ठिकाणी न ठेवता चार फूट बाजूला सरकवून लावली. यावरून राजेश्वर बोधलकर यांनी हटकले.

त्यामुळे आरोपी गुरुदास व राजेश्वर यांच्यात शाब्दिक वाद झाला. वाद सुरू असतानाच मुलगा सुरज घरातून कुऱ्हाड घेऊन धावत आला. दरम्यान,  गुरुदास पिपरे याने राजेश्वरला धरून ठेवले, तर सुरज पिपरे याने राजेश्वरच्या मानेवर सपासप कुऱ्हाडीचे तीन वार केले. यामध्ये राजेश्वर जागीच गतप्राण झाला. या घटनेने हळदी येथे खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: father and son killed neighbor for cutting tree branches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.