मराठी शाळेचा विद्यार्थी बनला फौजदार

By admin | Published: June 17, 2016 12:55 AM2016-06-17T00:55:37+5:302016-06-17T00:55:37+5:30

अधिकारी बनण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणे गरजेचे आहे, या समजुतीतून अनेक पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत दाखल करतात.

Faujdar became a student of Marathi school | मराठी शाळेचा विद्यार्थी बनला फौजदार

मराठी शाळेचा विद्यार्थी बनला फौजदार

Next

पहिल्याच प्रयत्नात मिळविले यश : वर्धा येथे पीएसआय म्हणून रूजू
राजकुमार चुनारकर खडसंगी
अधिकारी बनण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणे गरजेचे आहे, या समजुतीतून अनेक पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत दाखल करतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या एकदम घसरली आहे. त्यामुळे अनेक मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. याला प्रकाराला चपराक देत जिल्हा परिषदेच्या खडसंगी येथील मराठी माध्यमाचे शिक्षण घेवून पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण करून अमोल सुधाकर कोल्हे याने मराठी शाळेतील विद्यार्थ्यापढे एक आदर्श निर्माण केला आहे. मराठी शाळेत शिकुनही मोठ्या पदावर जाता येते, हे त्याने सिद्ध करून दाखविले आहे.
मुळचे ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील असलेले सुधाकर कोल्हे खडसंगी येथे आपल्या मामाजीच्या साह्याने खडसंगी येथे आलेत. वनविभागात काही दिवस काम करीत खडसंगीलाच त्यांनी आपली कर्मभूमी केली. खडसंगी मध्येच सुधाकर यांचा संसार वेलीवर आला. त्यांना दोन मुले व दोन मुली जन्माला आल्या. वनविभागात तुटपुंज्या मजुरीवर काम करून आपल्या परिवाराचे पालण पोषण करण्यास सुधाकर कोल्हे यांना मोठी कसरत करावी लागत होती.
सर्वसामान्य परिस्थिती असल्याने चारही मुलाचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच केले. त्यापैकी त्यांची मोठी मुलगी ही एम.ए. बी.एड. झाली. त्यामुळे सुधाकर कोल्हे यांच्या परिवारात शिक्षणाचे वातावरण असल्याने सर्वच मुलं शिक्षणात हुशार होते. मात्र परिस्थितीमुळे त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकविता आले नसल्याचे शल्य सुधाकर कोल्हे यांना होते. मात्र अमोलच्या या यशाने ते काही प्रमाणात समाधानी असल्याने त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होते.
अमोलने चवथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडसंगी येथे पूर्ण केले. तर अकरावीपासून आनंदवन वरोरा येथे नंतर शिक्षक बनण्याच्या दृष्टीने डी.एड. केले. मात्र डोनेशनसाठी पैसे नसल्याने शिक्षक बनण्याचे स्वप्न दूर ठेवत आता आपण एक चांगला अधिकारी बनावा, असा निश्चित करत अमोलने पुणे येथे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. अखेर अमोलला पहिल्याच प्रयत्नात यश आले.
पी.एस.आय. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अमोल प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकादमीत दाखल झाला. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नुकतेच ११३ व्या तुकडीची आटपरेड मुख्यमंत्री फडणवीस याच्या उपस्थितीत पार पडली. प्रशिक्षण यशस्वी करीत अमोलची पहिली नियुक्ती वर्धा येथे करण्यात आली.
आपल्या मुलाला खाकी वर्दीतील अधिकाऱ्याच्या वेशात बघुन अमोलच्या परिवारामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मनामध्ये जिद्द असल्याने वडील वनमजूर म्हणून वनविभागात तुटपुंज्या वेतनावर नोकरी करीत परिवाराचा गाढा चालवित होते. अमोलला पाहिजे तेवढे शैक्षणिक चांगले वातावरण नव्हते तरी मिळेल त्या साधनांच्या आधारे अमोलने खडसंगी सारख्या गावात यश मिळविल्याने खडसंगीचे नावही रोषण केले आहे.
मराठी शाळेचा विद्यार्थीही ‘फौजदार’ बनू शकतो हे अमोल कोल्हे यांनी दाखवून देत येणाऱ्या पिढ्यासमोर आदर्श निर्माण केला आहे.

Web Title: Faujdar became a student of Marathi school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.