मोकाट जनावरांमुळे अपघाताची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:31 AM2021-09-05T04:31:39+5:302021-09-05T04:31:39+5:30
वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या या जनावरांमुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले. मोकाट जनावरांचा बंदोबस्त मात्र करण्यास कुणीही पुढे येत नाही. ...
वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या या जनावरांमुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले. मोकाट जनावरांचा बंदोबस्त मात्र करण्यास कुणीही पुढे येत नाही. ब्रम्हपुरी शहराच्या मुख्य रस्त्यासह गल्लीबोळात मोकाट जनावरांचा मुक्तसंचार सुरू आहे. जनावरांचा धुमाकूळ वाढला आहे की नागरिकही जनावर दिसले की काढता पाय घेतात. शहरातील मुख्य शिवाजी चौक, ख्रिस्तानंद शाळेसमोर आणि देलनवाडी रस्त्यावर ठिकठिकाणी जनावरांचे कळप दिसून येतात. काही जनावरे तर चक्क रस्त्याच्या मधोमध ठिय्या देऊन बसतात. कितीही हाकलले तरी उठायचे नाव घेत नाहीत. शहरातील मुख्य परिसरातील शिवाजी चौक या भागात नागरिकांची दररोज गर्दी असते. त्या ठिकाणीही मोकाट जनावरे दिसून येतात. या जनावरांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर अंगावर चालून येण्याची भीती असते. मोकाट जनावरांमुळे विक्रेतेही त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर हातगाडीवर भाजीपाला विकणाऱ्यांना तर या जनावरांचा हमखास त्रास असतो. या जनावरांचा बंदोबस्त केला जात नाही. त्यांच्या मालकांचा शोध घेऊन कारवाईची मागणी होत आहे.
040921\img_20210805_133846.jpg
मोकाट जनावरे