कढोली(बू) कोरोना हॉटस्पॉट होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:29 AM2021-05-09T04:29:15+5:302021-05-09T04:29:15+5:30
नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात ...
नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात तापाची साथ सुरू असल्यामुळे नागरिक दहशतीत आहेत. मागील दोन आठवड्यापासून कढोली (बू) येथे तापाची साथ सुरू असल्यामुळे आरोग्य विभागाने शुक्रवारी कढोली (बू) येथे तपासणी शिबिर घेतले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली कढोली (बू) येथे सकाळी १० वाजल्यापासून तपासणी सुरू करण्यात आली. यात कढोली (बू) प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विपिनकुमार ओदेला, आरोग्य विभागाची चमू , आरोग्य कर्मचारी,सर्व आरोग्य सेविका, सरपंच राकेश हिंगाणे, ग्राम पंचायतीचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने आरोग्य चाचणी शिबिर घेण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे यांचे मार्गदर्शनात,डॉ. विपीनकुमार ओदेला व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कढोली (बू) येथील साईनाथ विद्यालयाला विलगीकरण लक्ष म्हणून घोषित केले असून यामध्ये २० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील नागरिकांना तपासणी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.