लाॅकडाऊनच्या भीतीने मजुरांना तेलंगणातून परतण्याची ओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:30 AM2021-02-24T04:30:08+5:302021-02-24T04:30:08+5:30
गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा येथे महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा पूल आहे. याच मार्गाने तेलंगणात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रातील असंख्य मजूरवर्ग मिरची ...
गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा येथे महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा पूल आहे. याच मार्गाने तेलंगणात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रातील असंख्य मजूरवर्ग मिरची तोडण्याकरिता तेलंगणा येथे गेला आहे. मागील वर्षी जीव मुठीत घेऊन परत यावे लागले. पुन्हा या मजुरांसमोर पोट भरण्याचे आव्हान होते. परत रोजगारासाठी मिरची तोडण्याकरिता असंख्य मजूर तेलंगणात गेले आहेत. मात्र, कोरोनाची दुसरी लाट समोर येण्याची चिन्हे दिसू लागल्याने मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परत देशात लाॅकडाऊन करावा लागल्यास तेलंगणात अडकून पडू. अन्न, वस्त्र, निवारा यापासून मुकावे लागेल, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण होऊ लागला आहे. लॉकडाऊनच्या इशाऱ्यामुळे मजुरांना स्वगृही परतण्याची ओढ लागली आहे.
कोट
मागील वर्षीप्रमाणे मजुरांवर अशी वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन मजुरांनी करावे. सरकारने बाहेर गेलेल्या मजुरांना परत येण्याचे आवाहन करूनच लॉकडाऊनचा विचार करावा.
-देवीदास सातपुते, सरपंच, पोडसा.