जनावरांत आजार पसरण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:20 AM2021-07-16T04:20:31+5:302021-07-16T04:20:31+5:30
रेडियम नसल्याने अपघाताची शक्यता चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम नसल्याने रात्रीच्यावेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. सध्या ...
रेडियम नसल्याने अपघाताची शक्यता
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम नसल्याने रात्रीच्यावेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे वाहनचालकांना रात्रीच्यावेळी समोरील रस्ता दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक रस्त्यावर रेडियम लावल्यास, अपघाताला आळा घालणे शक्य होणार आहे.
सौंदर्यीकरण वृक्षांची छाटणी
चंद्रपूर : शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या चंद्रपूर-नागपूर रोडवरील डिव्हायडरवर असलेल्या वृक्ष वाढले असून त्यांची मागील काही दिवसांपासून छाटणी सुरू केली आहे. यामुळे सौंदर्यात आणखीच भरत पडत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने उन्हाळ्याच्या दिवसातही दररोज पाणी देऊन या वृक्षांचे जतन केले आहे.
घंटागाडी नियमित पाठविण्याची मागणी
चंद्रपूर : येथील काही वाॅर्डामध्ये घंटागाडी अनियमित येत असल्याने नागरिकांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या परिसरात दररोज घंटागाडी पाठवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
अतिक्रमणामुळे शेतात
जाणे झाले कठीण
चंद्रपूर : ग्रामीण भागातील पाणंद रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. त्यातच पावसामुळे रस्त्यावर चिखल असल्यामुळे शेतकऱ्यांना येथून जाणे कठीण झाले आहे. काही शेतकऱ्यांनी कुंपण केल्यामुळे बैलबंडीला घेऊन जाणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्वच गावांतील पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली जात आहे.
जनावरांचा बंदोबस्त करावा
चंद्रपूर: शहरातील मोकाट कुत्रे तसेच जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर मोकाट जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघणे कठीण झाले. बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नावाचा फलक लावण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातून अनेक राज्य महामार्ग, तालुका मार्ग, ग्रामीण मार्ग आहेत. मात्र, यातील बहुतांश रस्त्यावर गावाच्या नावाचा फलक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गावाच्या नावाचा फलक लावण्याची मागणी केली जात आहे.
मुबलक खत पुरविण्याची मागणी
चंद्रपूर : मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना खतांसाठी भटकावे लागले होते. त्यामुळे यावर्षी कृषी विभागाने नियोजन करून शेतकऱ्यांना हंगामात पुरेल एवढे रासायनिक खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली. सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची गरज भासले.
वाहनांमुळे गोल बाजारात गर्दी
चंद्रपूर : येथील गोलबाजारामध्ये काही व्यावसायिक तसेच ग्राहक वाट्टेल तिथे आपले वाहन पार्क करत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या वाहनचालकांवर दंड आकारून त्यांना शिस्त लावावी, अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.
कृषी केंद्रांमध्ये गर्दी वाढली
चंद्रपूर : येथील कृषी केंद्रांमध्ये कृषी तसेच इतर साहित्य घेण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने गर्दी करीत आहे. ऑटो तसेच इतर वाहनांद्वारे गावातील शेतकरी शहरात दाखल होत आहेत.
स्वच्छतेकडे अधिक लक्ष देणे गरजेचे
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण सध्या कमी झाले असले तरी तिसऱ्या लाटेची भीती आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे असून रस्त्यांवर थुंकणे तसेच घरातही स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
आठवडी बाजार सुरू करा
चंद्रपूर : जिल्ह्यातील आठवडी बाजार अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. जिल्हा प्रशासनाने नियम तसेच अटी लादून आठवडी बाजार सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. वेगवेगळ्या दिवशी जिल्ह्यात आठवडी बाजार भरत होता. यामुळे छोटे-मोठे व्यापारीही यावर अवलंबून होते. मात्र, बाजार बंद झाल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.