कन्हाळगाव अभयारण्यात गुंजणार ‘त्या’ चार बछडयांची डरकाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:55 AM2020-12-11T04:55:21+5:302020-12-11T04:55:21+5:30

फोटो निलेश झाडे गोंडपिपरी : वाघांसाठी नंदनवन ठरणाºया कन्हाळगाव अभयारण्यात आता नव्याने भर पडणार आहे. डोंगरगाव-सुकवाशीत आढळून येणाºया ‘त्या’ ...

Fear of 'those' four calves will resound in Kanhalgaon sanctuary | कन्हाळगाव अभयारण्यात गुंजणार ‘त्या’ चार बछडयांची डरकाळी

कन्हाळगाव अभयारण्यात गुंजणार ‘त्या’ चार बछडयांची डरकाळी

Next

फोटो

निलेश झाडे

गोंडपिपरी : वाघांसाठी नंदनवन ठरणाºया कन्हाळगाव अभयारण्यात आता नव्याने भर पडणार आहे. डोंगरगाव-सुकवाशीत आढळून येणाºया ‘त्या’ चार बछडयांची डरकाळी येत्या काही दिवसात कन्हाळगाव अभयारण्यात गुंजणार आहे. विशेष म्हणजे, अभयारण्याचा क्षेत्रात दहापेक्षा अधिक वाघांचा आधीच वावर आहे. आंतरराज्यीय पर्यटनाला वाव असलेल्या कन्हाळगाव अभयारण्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मध्य चांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत येणाºया डोंगरगाव-सूकवाशी परिसरात वाघिणीसह चार बछडयांचा वावर असल्याचे आढळून आले आहे. परिसरातील शेतकºयांना, गुराख्यांना वाघिणीसह बछडयांचे दर्शन अनेकदा झाले आहे. वनविभागानेही याला दुजोरा दिला आहे. बाल्यावस्थेत असलेले हे चारही बछडे येत्या काही दिवसात मुक्तसंचार करणार आहेत. कन्हाळगाव अभयारण्यात धाबा परिसरातील बहुतांश वनक्षेत्राचा समावेश आहे. त्यामुळे या चारही वाघांची डरकाळी अभयारण्यात भविष्यात गुंजणार आहे. वाघांच्या बछडयांवर वनविभागाची नजर असून त्यांच्या सुरक्षेसाठी वनविभाग दक्ष आहे.

कोट

डोंगरगाव-सूकवाशी वनक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात पाळीव जनावरे ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या भागात गस्त करीत असताना वाघीण आणि बछड्यांचे पगमार्ग आढळून आले होते.

-एस.जे.बोबडे,

वनपरिक्षेत्राधिकारी धाबा

बॉक्स

दहा वाघ, २३ बिबट्यांची नोंद

नव्यानेच जाहीर झालेल्या कन्हाळगाव अभयारण्यातील वाघाच्या आकडेवारीबाबत मतभिन्नता आहे. दहा वाघ, २३ बिबटयांचा आवास अभयारण्यातील वनक्षेत्रात असल्याची रितसर नोंद वनविभागाकडे आहे. मात्र यापेक्षा अधिक वाघ,बिबट वनक्षेत्रात असल्याचे बोलले जात आहे.या आकडेवारीत आता नव्याने भर पडणार आहे.

बॉक्स

आंतरराज्यीय पर्टनाला वाव

बहुचर्चित कन्हाळगाव अभयारण्य अखेर घोषित झाले. या अभयारण्याला घेऊन अनेकांची उत्सुकता शिगेला गेली होती. वन्यजीव आणि दुर्मिळ प्राण्यांचा येथे अधिवास आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या अभयारण्याला लागून तेलंगणाची सीमा आहे. त्यामुळे कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने आंतरराज्यीय पर्यटनाला मोठा वाव आहे. गोंडपिपरी तालुक्याला त्याचा लाभ होणार, असे बोलले जात आहे.

Web Title: Fear of 'those' four calves will resound in Kanhalgaon sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.