चुनाळ्यात वाघाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:04 PM2018-10-12T23:04:51+5:302018-10-12T23:05:12+5:30
राजुरा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या चुनाळा शिवारातील नदीपट्टा भागात मागील १०-१५ दिवसांपासून पट्टेदार वाघाचे वास्तव्य असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांच्या व त्यांच्या जनावरांच्या जीवास धोका असून वाघाला जेरबंद करुन जंगलात सोडण्याची मागणी राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : राजुरा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या चुनाळा शिवारातील नदीपट्टा भागात मागील १०-१५ दिवसांपासून पट्टेदार वाघाचे वास्तव्य असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांच्या व त्यांच्या जनावरांच्या जीवास धोका असून वाघाला जेरबंद करुन जंगलात सोडण्याची मागणी राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापणीचा हंगाम सुरूझाला असून इतर पिकांचीही कामे शेतात सुरु आहेत. परंतु वाघाच्या दहशतीमुळे शेतातील कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडे विनंती केली होती. परंतु त्यांनी फक्त डफरे वाजवून वाघाला हाकलून लावण्याचा केविलवाना प्रयत्न केला. परंतु वाघाने अजूनही जागा सोडलेली नाही. या परिसरात त्याने डुकराची शिकार करुन बस्तान मांडले आहे. या वाघामुळे शेतकऱ्यांवर व त्यांच्या जनावरावर हल्ला होऊन जिवित हानी होण्याची शक्यता निमकर यांनी व्यक्त केली.