घरोघरी वाटल्या पक्षी घागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:26 AM2021-04-06T04:26:36+5:302021-04-06T04:26:36+5:30
तहानलेल्या पक्ष्यांना मिळणार पाणी : तरुण पर्यावरणवादी मंडळाचा उपक्रम शंकरपूर : दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत आहे. त्यामुळे पक्ष्यांना ...
तहानलेल्या पक्ष्यांना मिळणार पाणी : तरुण पर्यावरणवादी मंडळाचा उपक्रम
शंकरपूर
: दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत आहे. त्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळणे कठीण होत आहे. पाण्याअभावी हजारो पक्षी मृत्युमुखी पडत आहे. या पक्ष्यांना जीवदान देण्यासाठी येथील तरुण पर्यावरणवादी मंडळ पक्ष्यांना पाणी पाजण्याचे अमूल्य कार्य करीत आहे.
मागील पंधरा वर्षापासून गावात व परिसरात पक्षी घागर ही संकल्पना समोर आणली आहे. यानुसार सर्वात आधी त्यांनी गावात पक्षी घागर वाटप केल्या.
तसेच विद्यार्थ्यांना यात आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेतही पक्षी घागर वाटप केले. विध्यार्थ्यांना निसर्ग चक्रात पक्ष्याचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात येत होते. यावर्षी मंडळ, वनविभाग कार्यालय शंकरपूर व यांच्या संयुक्त विद्यमाने ५०० पक्षी घागर तयार करण्यात आले. या पक्षी घागर गावात वाटण्यात येत आहे. एवढेच नाहीतर घरातील सदस्यांना पक्षी घागरमध्ये पाणी टाकून पक्ष्यांना पाणी पाजण्याचे पुण्यकर्म करा, अशी विनंतीही करण्यात आली. या उपक्रमामुळे तहानलेल्या हजारो पक्षांना जीवदान मिळणार आहे. हे पक्षी घागर वनपाल यू.बी. लोखंडे, वनरक्षक रुपेश केदार, वनरक्षक भैसारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी प्रदीप गारघाटे, वीरेंद्र हिंगे, आमोद गौरकर, विजय गजभे, मोरेश्वर पांगुळ, संतोष कोरडे, जगदीश पेंदाम, अमित शिवरकर, शुभम शिवरकर, नीलेश शिवरकर, सतीश भजभुजे, सोनू बावनकर, महेश शिवरकर, भारत तांबरभोगे, अमर दळवे, आशिष चौधरी, बंटी भांडारकर, इम्तियाज शेख, भोजराज चौधरी, दीपक भेंडे, संदीप ठाकरे, महिंद्रा सवाईकर आदी उपस्थित होते.