कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:48 PM2019-01-31T22:48:49+5:302019-01-31T22:50:30+5:30

माना समाजाला न्यायालयाने आरक्षण दिले असून धनगर समाजालासुद्धा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत आहेत. गडचिरोली भाजप जिल्हा अध्यक्ष असताना मी आमदार कृष्णा गजभे व नुकतेच आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे यांना एबी फार्म देऊन निवडून आणले.

The feeling of any community is not hurt | कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या नाही

कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या नाही

googlenewsNext
ठळक मुद्देअशोक नेते : राजकीय विरोधकांचा बदनाम करण्याचा डाव

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : माना समाजाला न्यायालयाने आरक्षण दिले असून धनगर समाजालासुद्धा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत आहेत. गडचिरोली भाजप जिल्हा अध्यक्ष असताना मी आमदार कृष्णा गजभे व नुकतेच आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे यांना एबी फार्म देऊन निवडून आणले. तसेच इतर विषयावरसुद्धा सरकार माना व धनगर समाजाच्या पाठीशी आहे. काही दिवसांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन राजकीय विरोधकांनी मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. आपण माना समाज व धनगर समाज विरोधात नसल्याचे सांगत षडयंत्र रचणाºयांनी ठोस पुरावे द्यावे. माना व धनगर समाजाच्या नेत्यांना आवाहन करतो की कोणाच्या भूलथापांना बळी पडू नये. खोटी माहिती प्रसार माध्यमातून देणाºया त्या तथाकथित व्यक्ती विरुद्ध मानहानीचा दावा करून फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे खासदार अशोक नेते यांनी चिमूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
चिमूर-गडचिरोली क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्यावर केलेल्या आरोपाचे खंडन करण्यासाठी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेला स्वत: आ. किर्तीकुमार भांगडिया, वसंत वारजूकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ श्याम हटवादे, तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, उपस्थित होते.
खासदार अशोक नेते म्हणाले, २१ जानेवारीला गडबोरी येथील कार्यक्रमात आदिवासी नेत्यांनी प्रास्तविकातून प्रश्न विचारला की माना व धनगर समाज आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करीत आहे. यावर आळा बसला पाहिजे. यावर बोलताना मी त्यांना सांगितले की माना समाजाचा विषय कोर्टात आहे. तर त्यांना कोर्टाने अधिकार दिले. त्यामुळे मी यावर काही करू शकत नाही. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठीचा विषय शासन दरबारी आहे व यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. त्यामुळे मी यावर काही बोलू शकत नाही, असे मी बोललो होतो. मात्र विरोधकांनी काही लोकांना हाताशी धरून मी जे बोललो नाही ते बदलवून समाज माध्यमातून खोटी माहिती पसरवली. हे मला बदनाम करण्याचे विरोधकांनी रचलेले हे षड्यंत्र आहे, खा. नेते यांनी यावेळी स्पष्ट केले.
नेते यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सिंदेवाहीत मोर्चा
सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी या गावात आदिवासी समाजाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी उद्घाटनप्रसंगी माना समाजाबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. याचा व्हिडीओ व्हॉटसअ‍ॅपवर वायरल झाला. याच्या निषेधार्थ तालुक्यातील माना समाजाने तहसील कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो महिला, पुरूष सहभागी झाले होते. सदर मोर्चा शिवाजी चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हरी बारेकर, ग्रामपंचायत सदस्य रवी सावकुडे, अमोल नागोसे, स्वप्नील श्रीरामे सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयावर विसर्जित करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी खा. अशोक नेते यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Web Title: The feeling of any community is not hurt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.