ठाणेदारांकडून प्रामाणिक आॅटो चालकाचा सत्कार
By admin | Published: April 9, 2017 12:45 AM2017-04-09T00:45:05+5:302017-04-09T00:45:05+5:30
आॅटो चालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणाची दखल घेऊन ठाणेदार निकम यांनी त्याचा पोलीस स्टेशनच्या आवारात शाल व श्रीफळ देवून सत्कार केला.
भद्रावती : आॅटो चालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणाची दखल घेऊन ठाणेदार निकम यांनी त्याचा पोलीस स्टेशनच्या आवारात शाल व श्रीफळ देवून सत्कार केला.
यावेळी कार्यक्रमाचे तहसीलदार सचिन कुमावत म्हणाले की, प्रामाणिक आॅटो चालकाच्या शेजारी बसून त्यांचेसोबत दोन गोष्टी बोलता आल्या याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. तहसीलदार कुमावत व ठाणेदारांच्या हस्ते आॅटोचालक राजू सपकाळ याचा सत्कार करण्यात आला. सपकाळ यांनी त्यांच्या आॅटोमध्ये राहिलेल्या रसिका लोखंडे या नागपूरच्या स्वावलंबी नगरातील महिलेचे ७० हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कमेची बॅग परत केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाची प्रेरणा इतरांनीही घ्यावी. हा या सत्कारामागील उद्देश होता, असे ठाणेदार विलास निकम यांनी सांगितले.
यावेळी भद्रावती शहर काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप ठेंगे, भाकपाचे जिल्हा सरचिटणीस राजू गैनवार यांनीही विचार मांडले. उपस्थितांचे आभार सहायक पोलीस निरीक्षक इलामुलवार यांनी मानले. यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक सुशील धोकटे, दिलीप मांढरे, विनायक येसेकर व इतर उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)