रमाबाई आंबेडकर विद्यालयात सत्कार

By admin | Published: June 16, 2016 01:42 AM2016-06-16T01:42:44+5:302016-06-16T01:42:44+5:30

रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय सावलीच्या वतीने १० वी व १२ वीच्या परीक्षेत

Felicitated at Ramabai Ambedkar University | रमाबाई आंबेडकर विद्यालयात सत्कार

रमाबाई आंबेडकर विद्यालयात सत्कार

Next


सावली : रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय सावलीच्या वतीने १० वी व १२ वीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मंगळवारी सत्कार करण्यात आला.
शालांत परीक्षा मार्च २०१६ मध्ये जे विद्यार्थी ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले. त्या सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शाळेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यात इयत्ता १२ वी कलामधून ऐश्वर्य महादेव लाकडे याने कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला. सुभाष रवींद्र शेंडे ८२.९२ टक्के गुण घेऊन दुसरा तर शिबु प्रेमदास कोकोडे ८२.१५ टक्के गुण मिळवून तिसरी आली आहे. विज्ञान शाखेतून प्रथम साहील गोवर्धन रावळे ८२.६१ टक्के, चेतन दिवाकर गंडाटे ८०.८७ टक्के दुसरा व गणेश बंडू लाटेलवार ८० टक्के गुण घेऊन तिसरा आला आहे.
१० वीमध्ये शाळेचा निकाल ८२.७५ टक्के लागला. त्यात मृणाली राजेश राऊत ८८ टक्के गुण घेऊन प्रथम, द्वितीय हीना कृपादास मंडरे ८७ टक्के गुण, तिसरी साची किशोर दुधे व दिव्या चंद्रहास दुधे यांनी प्रत्येकी ८६.५० टक्के गुण घेतले. या शाळेतील १० विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने पालकांसह करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. वाय. गेडाम यांनी विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षकांचेही कौतुक केले. पुढे यापेक्षा अधिक प्रगती करण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या. मंचावर मुख्याध्यापक यू. एच. भैसारे, सचिव जे. एस. दुधे, सदस्य ए. जी. गेडाम. एच. जे. दुधे, आर. के. गेडाम, पी. यू. गेडाम, प्र. प्राचार्य रामटेके, पर्यवेक्षक घनश्याम भडके उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहायक शिक्षक दीपक रायपुरे, आभार एन. एल. शेंडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Felicitated at Ramabai Ambedkar University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.