कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
By admin | Published: January 11, 2017 12:44 AM2017-01-11T00:44:18+5:302017-01-11T00:44:18+5:30
महिलांनी सावत्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांच्या विचारांनी कार्य केल्यास महिलांची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही, ...
चंद्रपूर: महिलांनी सावत्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांच्या विचारांनी कार्य केल्यास महिलांची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही, असे प्रतिपादन दलितमित्र डी. के. आरीकर यांनी केले. सत्यशोधक समाजाच्या वतीने स्थानिक छत्रपती शाहू महाराज सभागृह येथे आयोजित कर्तुत्ववान महिलांचा सत्कार घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष हिराचंद बोरकुटे होते. प्रा. डॉ. प्रभा वासाडे, ज्योती शहारे, किशोर पोतनवार, शंकरराव सागोरे, प्रा. एस. टी. चिकटे, खुशाल तेलंग, दिवाकर पेंदाम, शाहिदा शेख, प्रा. माधव गुरनुले, शीतल इटनकर, प्रदीप अडकिणे, संक्षिप्ता शिंदे, सुधाकर मोकदम, प्रवीण मोरे, दिनेश एकवनकर, गोपी मित्रा, सुभाष थोरात, महेंद्र शेरकी यांची उपस्थिती होती.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सावित्रीबाई फुले समाजसेविका पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. त्यात सरिता मालू, आशा बरडे, प्रियंका वरघने, नेहा मानकर, ज्योती खंडेलवाल, रेणू खंडेलवाल यांच्यासह ५० महिलांचा सावित्रीबाई फुले समाजसेविका पुरस्काराने गौरव करण्यात आला. संचालन अरुण धानोरकर यांनी तर आभार प्रा.एस. टी. चिकटे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)