गुणवंतांचा सत्कार, प्रशिक्षण व जनजागृती
By admin | Published: July 12, 2014 01:06 AM2014-07-12T01:06:39+5:302014-07-12T01:06:39+5:30
जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये गुणवंतांचा सत्कार, जनजागृतीपर कार्यक्रम व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
चंद्रपूर : जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये गुणवंतांचा सत्कार, जनजागृतीपर कार्यक्रम व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
संस्कार कॉन्व्हेंट, चंद्रपूर
चंद्रपूर : येथील संस्कार कॉन्व्हेंट मध्ये माता सरस्वतीच्या मूर्तीचे स्थापना करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थाध्यक्ष उमाकांत धांडे यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका योगिता धांडे यांनी केले. संचालन माधुरी ढेंगळे यांनी मानले.
राजीव गांधी इंजिनिअरींग कॉलेज
चंद्रपूर : राजीव गांधी कॉलेज आॅफ इंजिनिअयरींग रिसर्च अॅन्ड टेक्नॉलाजी चंद्रपूर येथे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विद्यामाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. यावेळी माजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, प्राचार्य डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, डॉ. अनंत हजारे, राजेंद्र गौतम, प्रा. नागेश्वर गंडलेवार, प्रा. पराग धनकर ,प्रा. महेंद्र भोंगाडे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. गुल्हाणे यांनी केले. कार्यक्रमासाठी संजय फुलझेले, दिलीप मिश्रा व भगवान तिवारी यांनी सहकार्य केले.
शिवाजी इंग्लीश स्कूल, नांदाफाटा
लखमापूर : श्री शिवाजी इंग्लीश हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज नांदाफाटा येथे पालक शिक्षक संघाची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी श्यामसुंदर राऊत, प्रमुख अतिथी डॉ. देवराव जोगी, प्राचार्या अॅल्वक्सी डिसोझा, सुषमा कश्यप, प्रा. गजानन राऊत, केदार उरकुडे आदी उपस्थित होते. नवीन शैक्षणिक सत्रातील बदल, वाहतूक व्यवस्था, अभ्यासक्रमात पालकांची भूमिका आणि शाळा व्यवस्थापण समिती आदींविषयी माहिती देण्यात आली. मागील शैक्षणिक प्रगतीचा मागोवा घेण्यात आला. शासनाच्या विविध शैक्षणिक योजना, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, आवश्यक कागदपत्रे आदींची माहिती पालकांना देण्यात आली. संचालन गिता प्रभू तर आभार विठ्ठल टोंगे यांनी मानले.
नांदा येथे पालक
शिक्षक संघाची बैठक
लखमापूर- नांदा येथील श्री प्रभु रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात पालक- शिक्षक संघाची बैठक पार पडली. यावेळी गुरुकुल महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल मुसळे, प्राचार्य राजेश डोंगरे, प्रा. प्रशांत पुराणिक, प्रा. प्रकाश लालसरे, प्रा. दुर्योधन, प्रा. गौरकार, प्रा. सचिन बोढाले उपस्थित होते. यावेळी प्राचार्य मुसळे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डोंगरे यांनीही पालक आणि शिक्षकाचा समन्वय शैक्षणिक समृद्धीसाठी महत्वपूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त केला. उपस्थित पालकांनी शिक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. संचालन प्रा. प्रज्ञा आवारी तर आभार प्रा. रत्नाकर बोबाटे यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक, पालक संख्येने उपस्थित होते.
माता महाकाली आयटीआय
चंद्रपूर- माता महाकाली बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूरद्वारे संचालित माता महाकाली आयटीआय, माता महाकॉली पॉलिटेक्नीक आणि माता महाकाली अॅडव्हान्स टेक्नॉलाजी वरोरा या शिक्षण संस्थेचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. संस्थाअध्यक्ष सचिन साधनकर, प्राचार्य पी. व्ही. बाभुळकर, अमित जोगे, वाघमारे, मिस्त्री, प्रशासक गर्गेलवार व श्याम पिंपळे आदींची उपस्थिती होती.
तुमगाव शाळेत कार्यक्रम
टेमुर्डा- जि.प.उच्च प्राथमिक शाळा तुमगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडू काकडे उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थी तसेच बाहेरगावाहून नाव दाखल करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. केंद्रप्रमुख किशोर कामडी यांनी भेट देवून मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका आशा पेकडे, ओंकार घुगूल, शुभांगी पिजदूरकर, शितल सोलेकर उपस्थित होते. संचालन नरेंद्र कोसुरकर यांनी केले.
मातोश्री विद्यालय, चंद्रपूर
चंद्रपूर- स्थानिक गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित मातोश्री बालवाडी, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय तुकूम येथे शिक्षक, पालक, माता पालक आणि शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापक सूर्यकांत खनके यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास हे विद्यालयाचे ध्येय असून पालक शिक्षकांनी जागृत असायला पाहिजे. विद्यार्थी अधिक काळ पालकांच्या सानिध्यात घालवितो तसेच पालकांनी विद्यार्थ्यांनी हितगुज करुन त्यांच्या भावना जाणून घ्याव्या व त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती खनके यांनी केली. मेळाव्यामध्ये शिक्षक पालक संघ व माता पालक संघ तसेच व्यवसाय मार्गदर्शन समिती स्थापन करण्यात आली. पालक शिक्षक संघामध्ये सभाध्यक्ष माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे सी.बी. कोहाडे व प्राथमिक विद्यालयातर्फे वर्षा महाडोरे, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष प्रिमती चव्हाण, आणि प्रविण नंदगिरवार यांची नेमणूक करण्यात आली.