इनरव्हील क्लबतर्फे शिक्षकांचा सत्कार

By admin | Published: September 26, 2016 01:15 AM2016-09-26T01:15:55+5:302016-09-26T01:15:55+5:30

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस व शिक्षक दिवस यानमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात इनरव्हील

Fellow Teachers by Innervevel Clubs | इनरव्हील क्लबतर्फे शिक्षकांचा सत्कार

इनरव्हील क्लबतर्फे शिक्षकांचा सत्कार

Next

चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस व शिक्षक दिवस यानमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात इनरव्हील क्लब आॅफ चांदा फोर्टतर्फे विशेष गुणवत्ता प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम जि.प. उच्च प्रायमरी शाळा दाताळा येथे झाला.
योग्य शिक्षकांची निवड करण्यासाठी क्लबच्या अध्यक्षा मिनाक्षी अंजीकर व सचिव अर्चना राऊतमारे यांनी सहा शाळांचे सर्वेक्षण केले. प्रत्येक शाळातून १० विद्यार्थी निवडण्यात येऊन त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात आले. यावेळी संध्या मोडक, गजानन मरापे, स्वाती बेत्तावार, समिता घाटे, रेखा वंजारी, विवेक इत्तडवार या सहा शिक्षकांची निवड करण्यात येऊन त्यांना राष्ट्रीय निर्माण पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. पुरस्कार वितरण इनरव्हीलच्या डिस्ट्रिक्ट ईएसओ वर्षा कोतपल्लीवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच क्लबतर्फे ४७ शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तीन प्रशिक्षकांना स्मृतीचिन्ह देऊन गौरवान्वित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रकल्प निर्देशक अर्चना राऊतमारे, मिनाक्षी अंजीकर व जया मुनगंटीवार होत्या. त्याचप्रमाणे इनरव्हील क्लबतर्फे कवठी येथील वरभे हायस्कूलमध्ये ‘हॅपी थॉट्स’चा कार्यक्रम घेण्यात आला. वक्ते गोपाल राजपुरोहित यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास वर्षा कोतपल्लीवार, वृंदा मामीडवार, क्लबचे इतर सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Fellow Teachers by Innervevel Clubs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.