समाजात स्त्रीभ्रृण हत्या अभिशाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:40 AM2017-10-07T00:40:04+5:302017-10-07T00:40:14+5:30

लिंग भेद करण्यामुळे सामाजिक संतुलन धोक्यात येत आहे. स्त्री-पुरुष असमानता वाढीस लागणारी मानसिकता धोक्याचे वळण घेत आहे.

 Feminine killing curse in society | समाजात स्त्रीभ्रृण हत्या अभिशाप

समाजात स्त्रीभ्रृण हत्या अभिशाप

Next
ठळक मुद्देचंदनसिंह चंदेल : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : लिंग भेद करण्यामुळे सामाजिक संतुलन धोक्यात येत आहे. स्त्री-पुरुष असमानता वाढीस लागणारी मानसिकता धोक्याचे वळण घेत आहे. शासन लिंग भेद नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करा, ती आशेचा किरण आहे, तिची गर्भात हत्या करू नका, समाजातील स्त्रीभ्रूण हत्या हा अभिशाप असून याला दूर करण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज आहे, असे प्रतिपादन वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी येथे गुरुवारी केले.
येथील महात्मा ज्योतिबा फुले तेलगू, उर्दू व हिंदी माध्यमिक विद्यालय, डॉ.झाकीर हुसेन वार्डमध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रमांतर्गत उद्घाटक म्हणून चंदेल बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगर पालिकेच्या उपाध्यक्षा मीना चौधरी, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, नगरसेवक आशा संगीडवार, मुख्याध्यापक राजकुमार मुत्तलवार, सैफुद्दीन, संजय बाजपेयी यांची उपस्थिती होती.
यावेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नामुळे मुलींना शिक्षणाची दारे उघडली. शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे प्रत्येक क्षेत्रावर महिलांनी दबदबा निर्माण केला आहे. परंतु वंशाचा दिवा म्हणून मुलापेक्षा मुलींना गौण दर्जा दिला जातो, ही मानसिकता बदलावी, असे त्या म्हणाल्या.

Web Title:  Feminine killing curse in society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.