मालडोंगरीवर तयार होणार फळरोपवाटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:30 AM2019-06-21T00:30:25+5:302019-06-21T00:31:05+5:30

ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून दरवर्षी फळांच्या रोपांची दरवर्षी वाढत असल्याने मालडोंगरी येथील बीज गुणन प्रक्षेत्राचे फळरोपवाटिकेत विस्तारीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याकरिता ९५ लाखांचा निधी मंजूर केला असून लवकरच पायाभूत कामांना सुरूवात होणार आहे.

Fertile fruit prepared in Maldangari | मालडोंगरीवर तयार होणार फळरोपवाटिका

मालडोंगरीवर तयार होणार फळरोपवाटिका

Next
ठळक मुद्दे९५ लाख मंजूर : बीज गुणन प्रक्षेत्राचे विस्तारीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून दरवर्षी फळांच्या रोपांची दरवर्षी वाढत असल्याने मालडोंगरी येथील बीज गुणन प्रक्षेत्राचे फळरोपवाटिकेत विस्तारीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याकरिता ९५ लाखांचा निधी मंजूर केला असून लवकरच पायाभूत कामांना सुरूवात होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील फळबाग लागवडीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणार आहे.
मालडोंगरी येथे सन १९६१ रोजी बीज गुणन प्रक्षेत्र स्थापन करण्यात आले. या प्रक्षेत्रात २० हेक्टर ४० आर जमीन आहे. यापैकी गोसेखुर्द प्रकल्पाखालील क्षेत्र ४ हेक्टर ३० आर आणि बांधकामाखाली ०.३० आर जमीन राखीव ठेवण्यात आली. उर्वरीत १५ हेक्टर ८० आर क्षेत्रावर रोपवाटिका तयार करण्यासाठी अनुकूलता आहे. सदर प्रेक्षत्रावर बारमाही सिंचनाची सुविधा असल्याने रोपवाटिका स्थापन करण्याला वाव आहे. हे प्रक्षेत्र नागभीड उपविभागात येते. मागील काही वर्षांपासून ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी आंबा. कागदी लिंबू, पेरु, जांभुळ, आवळा, डाळींब आदी प्रमुख पिकांच्या रोपांची मागणी करीत आहेत. शिवाय महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत फळबाग लागवडीकरिता कलमा रोपांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता निर्माण झाली. परंतु जिल्ह्यातील अन्य क्षेत्रात अशी भौगोलिक परिस्थिती नसल्याने रोपे मिळविण्यासाठी प्रशासनाला अन्य राज्यातील जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. सद्यस्थितीत मालडोंगरी येथील बीज गुणन प्रक्षेत्रावर आंब्याचे २४ मातृवृक्ष आहेत. या ठिकाणी कागदी लिंबू, पेरु, जांभुळ, आवळा, डाळींब आदी मातृवृक्षांची लागवड केल्यास शेतकऱ्यांनाही याचा लाभ होऊ शकतो. याच हेतूने मालडोंगरी येथील प्रक्षेत्राचे फळरोपवाटिकेत विस्तारीत करण्यात येणार आहे. रोपवाटिका निर्माण केल्यास वेगळी कर्मचारी पदे आणि प्रक्षेत्रावरील कोणत्याही घटकावर परिणाम होणार नाही. वित्तीय भार पडणार नाही. या प्रक्षेत्रावर रोपवाटिका तयार झाल्यानंतर परिसरातील शेतकºयांना कलमा रोपांची उपलब्धता होऊन फळबाग लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.

शेतकऱ्यांना चालना
शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी ही रोपवाटिका उपयुक्त ठरणार आहे. प्रक्षेत्रातील कलमे रोपे विक्रीपासून आर्थिक फायदा होईल. मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. एकूण उपलब्ध क्षेत्रापैकी १५.८० हे. क्षेत्रावर तालुका फळरोपवाटिका स्थापन करण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने राज्य शासनाकडे पाठविला होता. राज्य शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत उच्च तंत्रज्ञानावर आधारीत फळरोपवाटिका स्थापन करण्यास मंजुरी प्रदान केली. प्रकल्पासाठी ९६ लाखांचा निधी तातडीने देण्याचा आदेश कृषी विभागाचे सहसचिव अशोक आत्राम जारी केला आहे.

Web Title: Fertile fruit prepared in Maldangari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.