शंकरपूर येथे शेतकऱ्याच्या बांधावर खतवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:47+5:302021-06-06T04:21:47+5:30
शंकरपूर : येथील मंडळ कृषी अधिकारी या कार्यालयांतर्गत येणाऱ्या शेतकरी गटांना शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे वाटप कार्यक्रम ...
शंकरपूर : येथील मंडळ कृषी अधिकारी या कार्यालयांतर्गत येणाऱ्या शेतकरी गटांना शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे पुरवठा करण्यात आला. या उपक्रमाचा भाग म्हणून शंकरपूरजवळील वाकरला येथील बालाजी शेतकरी स्वयंसहायता बचत गट व आजगाव येथील सिद्धी शेतकरी स्वयंसहायता बचत गट यांनी रासायनिक खते व बियाण्यांची उचल करण्यात आली. या कार्यक्रमाचा शुभारंभ शंकरपूर येथील सरपंच साईश वारजुकर यांनी हिरवी झेंडी देऊन केला, तसेच गावात जाऊन कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासणे, बीज प्रक्रिया, भात बियाण्याची लागवड, कापूस आणि सोयाबीन यांची पेरणी पद्धत व पिकाचे नियोजन यावर प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक, बचत गटाचे अध्यक्ष, सचिव कृषी केंद्राचे संचालक वैद्य आदी उपस्थित होते.