चंद्रपुरातून पुणे व मुंबईसाठी धावणार फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 02:00 PM2024-10-11T14:00:57+5:302024-10-11T14:03:16+5:30

Chandrapur : सामान्य प्रवाशी, विद्यार्थी व व्यावसायिकांची अडचण दूर

Festival special train will run from Chandrapur to Pune and Mumbai | चंद्रपुरातून पुणे व मुंबईसाठी धावणार फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे

Festival special train will run from Chandrapur to Pune and Mumbai

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर :
सणासुदीच्या दिवसात जिल्ह्याबाहेर वास्तव्य करणाऱ्या, शैक्षणिक कारणामुळे पुणे, मुंबई व इतरत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच जिल्ह्यातून स्वगृही ये-जा करण्यासाठी रेल्वेची सुलभ सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी चंद्रपूर व बल्लारपुरातून फेस्टिव्हल स्पेशल गाड्या सुरू होणार आहेत, अशी माहिती माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दिली.


दिवाळी व अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर ट्रेन क्र. ०१४५१ पुणे करीमनगर २१ ऑक्टोबर २०२४ रोजी, तर ट्रेन क्र. ०१४५२ करीमनगर - पुणे २३ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रवाशांच्या सुविधेसाठी सोडण्यात येणार आहे. याबरोबरच ट्रेन क्र. ०७१९७ काजीपेठ - दादर (साप्ता.) १२ ऑक्टोबर २०२४ रोजी, तर ट्रेन क्र. ७१९८ दादर काजीपेठ १३ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रत्येक रविवारी प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे. या विशेष गाड्यांमुळे चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या व सणासुदीला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होईल. एसटी व खासगी बसेसमधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचा मानसिक व आर्थिक त्रास यामुळे कमी होणार आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वे गाड्यांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले. 


असे आहे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक
ट्रेन क्र. १४५१ पुणे - करीमनगर सोमवार, २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पुणे येथून रात्री २२:४५ वाजता रवाना होईल. ही गाडी अहमदनगर २:०० वाजता, मनमाड ५:२०, औरंगाबाद ७:३५, जालना ८:३२, नांदेड १२:१५, आदिलाबाद १६:१०, चंद्रपूर २०:३७, बल्लारशाह २१:५०, करीमनगर येथे बुधवारी रात्री २:०० वाजता पोहोचेल. ट्रेन क्र. ०१४५२ करीमनगर - पुणे बुधवार, २३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ६:०० वाजता रवाना होऊन बल्लारशाह येथे १०:१० वाजता पोहोचेल. चंद्रपूर १०:३०, आदिलाबाद १३:५५, नांदेड १७:३५, जालना २०:२२, औरंगाबाद २१:४५, मनमाड गुरुवारी पहाटे २:२५, अहमदनगर ६:०२, पुणे येथे ९:४५ वाजता पोहोचेल. या स्थानकांव्यतिरिक्त दौंड, परभणी, पूर्णा, पिंपळखुटी, किनवट, बोधादी, सहस्वाकुंड, हिमायतनगर, भौकर, मुदखेड, सेलू, परतूर, रोटेगाव, कोपरगाव, माजरी, शिरपूर कागजनगर, मंचेरियल, रामगुंडम व पेदापल्ली स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. ट्रेन क्र. ०७१९७ काजीपेठ - दादर (साप्ता.) ही शनिवार, १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता रवाना होऊन बल्लारशाह येथे १६:०५ वाजता पोहोचेल. त्यानंतर चंद्रपूर १६:२५, भांदक १६:४५, वणी १७:२५, आदिलाबाद २१:३५, नांदेड १:४५, (रविवार) पोहोचणार आहे. 

Web Title: Festival special train will run from Chandrapur to Pune and Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.