चिमूरच्या बाजारओळीत भीषण आग

By admin | Published: June 27, 2017 12:41 AM2017-06-27T00:41:44+5:302017-06-27T00:41:44+5:30

शहरातील मुख्य बाजारपेठलगत असलेल्या साई मंदिराच्या जवळील छबुताई चुंचूवार यांच्या पुरातन वाड्याला सोमवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास आग लागली.

Fierce fire in the market of Chimur | चिमूरच्या बाजारओळीत भीषण आग

चिमूरच्या बाजारओळीत भीषण आग

Next

७० लाखांचे नुकसान : कापडाच्या गोडाऊनसह चुंचूवार यांचा वाडा जळून खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : शहरातील मुख्य बाजारपेठलगत असलेल्या साई मंदिराच्या जवळील छबुताई चुंचूवार यांच्या पुरातन वाड्याला सोमवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीने उग्र रूप धारण करून जवळपास असलेल्या तीन दुकानांसह कापडाच्या गोडाऊनला आपले लक्ष्य केले. यामध्ये ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविला जात आहे.
शॉर्ट सक्रिट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रमजान ईदच्या पूर्वरात्री काही युवक या चौकातून जात असताना चुंचूवार यांच्या घरातून धूर निघत असताना दिसले. तेव्हा या युवकांनी जनरल स्टोअर्स मालकाला जागवून आगीची माहिती चिमूर पोलिसांना दिली. ठाणेदार दिनेश लबडे हे आपल्या सहकाऱ्यांना घेवून काही युवकाच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा जोर वाढतच गेला. तेव्हा पाहता-पाहता परिसरातील नागरिक घटनास्थळावर जमा झाले. नागरिक मदत करण्यासाठी जे जमेल ते करू लागले, पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडत होते. आगीचे रूद्र रूप बघून वरोरा व उमरेड येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र अग्निशमन दल येईपर्यंत आगीने दोन दुकानासह एका कापड्याच्या गोडावूनला आपले भक्ष्य बनविले. आग विझेपर्यंत छबुताई चुंचुवार यांचा पुरातन वाडा जळून खाक झाला. त्यामध्ये त्याचे ५ लाख ४५ हजाराचे नुकसान झाले. कांताबाई असावा यांचे कापड्याचे गोडाऊन जळाले. त्यात ३८ लाख रुपयांचे कपडे जळाले. तृप्ती विजय कामडी यांच्या जनरल स्टोर्समधील १ लाख २६ हजार रुपयाचा माल, सुरेश चौधरी यांचे २५ लाख तर चंद्रशेखर डबले यांचे १ लाख ५० हजारांचे साहित्य जळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पोलीस व युवकांच्या सतर्कतेने टळली जिवीत हानी
चुंचूवार यांच्या वाड्यात किरायाने राहणाऱ्या घरात दोन गॅस सिलिंडर होते. मात्र आगीची पर्वा न करता मागचा दरवाजा तोडून काही युवक व पोलिसांनीही सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे स्फोट घडण्यापासून बचावले. मध्यरात्री लागलेली आग विझविताना नागरिकांनी वॉटर टँकर, बादलीने पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रुप घेतल्याने टँकर व पाईपनेही आग विझविण्यात नागरिकांना यश येत नव्हते. तर अग्निशन दलाच्या दोन गाड्या पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र दोन बमखल मधील पाणीही अपुरे पडले. तेव्हा येथील तपासे यांच्या विहिरीवरून अग्निशमन गाडीत पाणी भरून तब्बल सहा तासाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

Web Title: Fierce fire in the market of Chimur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.