पंधरा वर्षांपासून सुरू आहे घरकुलसाठी संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:46 AM2018-01-05T00:46:06+5:302018-01-05T00:46:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी : बल्हारपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोठारी येथील आर्थिकदृष्ट्या मागास व पात्र व्यक्तिंना मागील पंधरा वर्र्षांपासून घरकुलसाठी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करीत आहेत़ मात्र, विविध कारणे पुढे करून लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला़
रमेश झाडे यांनी घरकुलसाठी ग्रा.पं.च्या कार्यालयात अर्ज दाखल केले होते़ त्यांचे कुटुंबिय दारिद्र्य रेषेखाली येते़ सदर प्रकार एकट्या रमेश झाडे यांची नसून इतर मागास प्रवर्गातील अनेकांच्या बाबत घडला घडला आहे़ सन २०१६-१७ या वर्षात अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास प्रवर्गातील ४४४ दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाल्याची यादी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली.
त्यासाठी लाभार्थ्यांकडून कागदपत्राची मागणी करण्यात आली होती. कागदपत्रांची पूर्तता करूनही आजपर्यंत घरकुल देण्यात आले नाही. पंतप्रधान आवास योजनेतून कोठारी येथे ३४ घरकुल मंजूर झाले. त्यांचे कामही सुरु झाले. मात्र, त्यापूर्वी असलल्या ४४४ पैकी १४४ लाभार्थ्यांना घरकुल नामंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. या लाभार्थ्यांचा पंतप्रधान घरकुल योजनेत समाविष्ठ न केल्याने भविष्यात घरकुलचा लाभ मिळण्याची आशा धूसर झाली आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील बहुतेक कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळाला़ मात्र दारिद्र्य रेषेखाली इतर मागास प्रवर्गातील गरीबांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे.
इतर मागास प्रवर्गातील गोरगरीबांचे जीवनमान अतिशय गरीबीचे आहे़
मोलमजुरी करुन कुटुंबाचा गाडा हाकतात़ मुलांचे शिक्षण, लग्न करताना त्यांची दमछाक होत आहे. इंदिरा आवास व शबरी योजनेतून अनेक कुटुंबातील दोन-तीन व्यक्तींना तसेच सधन कुटुंबानाही लाभ देण्यात आला. पंतप्रधान योजनेत सध्या मंजूर घरकुल लाभार्थी आर्थिकदृष्ट्या संपन्न असताना त्यांनाही पात्र ठरविण्यात आले आहे.
परंतु, जे प्रत्यक्ष योजनेसाठी लाभार्थी आहेत़ ज्यांना घरकुलाची निंतात आवश्यकता आहे़ त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे़ त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी या योजनेची चौकशी करून पात्र व्यक्तिंना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे़