हक्कासाठी संघटित होऊन संघर्ष करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:04 PM2018-10-30T23:04:56+5:302018-10-30T23:05:18+5:30

शिक्षण हे सर्वसमावेशक असले पाहिजे. मात्र सध्याचे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालत असून देशाचा इतिहास बदलायला निघाले आहे. शिक्षण क्षेत्रात अनागोंदी कारभार सुरू आहे.

Fight for unity and fight for the claim | हक्कासाठी संघटित होऊन संघर्ष करा

हक्कासाठी संघटित होऊन संघर्ष करा

Next
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : विमाशि संघाचे जिल्हा अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : शिक्षण हे सर्वसमावेशक असले पाहिजे. मात्र सध्याचे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालत असून देशाचा इतिहास बदलायला निघाले आहे. शिक्षण क्षेत्रात अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे हक्क मिळवण्यासाठी शिक्षकांनी संघटित होऊन संघर्ष करावे, असे प्रतिपादन आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले तर प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश देवतळे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष संध्या गोहोकर, गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अजय लोंढे, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे राज्यअध्यक्ष वितेश खांडेकर, सत्कारमूर्ती अशोक पोफळे पी. टी. ठाकरे, जगदीश जुनघरे, ओमदास तुराणकर ,अनिल दागमावार हरीश ससनकर,मुकुंदा जोगी, मोरेश्वर बारसागडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. जुनी पेन्शन योजना आमचा हक्क आहे. तो आम्हाला मिळालाच पाहिजे, यासाठी संघटनेच्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अन्यथा पेन्शन नाही तर मतदान नाही, ही भूमिका संघटनेच्या वतीने घेण्यात आली असल्याची माहिती राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी यावेळी दिली.
अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा झाली. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये शालिक माऊलीकर, दीपक जेऊरकर, रमेश पिंपळशेंडे, राजू धांडे ज्ञानेश्वर गौरकार ,प्रशांत हजारे सुदर्शन बारापात्रे, किरण पराते, दुष्यंत निमकर, शिक्षण विस्तार अधिकारी मनोज गौरकार, जिल्हा अध्यक्ष केशव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, कार्याध्यक्ष लक्ष्मण धोबे,दिगंबर कुरेकर, वसुधा रायपुरे ,सुनील शेरकी, अनिल कंठिवार, नितीन जिवतोडे, शालिक ढोरे, अनिता अमृतकर, नभीलास भगत, ज्ञानेश्वर सोनकुसरे, देवराव निब्रड, हरिभाऊ पाथोडे, प्रभाकर पारखी, दीपक धोपटे,अशोक खनके, मंजुषा धाईत आदींचा समावेश होता.
संचालन आनंद चलाख व सुरेखा मोरे, प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे अहवाल वाचन जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे यांनी केले. आभार दिगंबर कुरेकर यांनी आभार मानले.

Web Title: Fight for unity and fight for the claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.