शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आमदारांची संघर्ष यात्रा

By admin | Published: March 30, 2017 12:43 AM2017-03-30T00:43:33+5:302017-03-30T00:43:33+5:30

शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकरी सन्मानासाठी निघालेली विरोधी पक्षातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांची किसान कर्जमुक्ती संघर्ष यात्रा बुधवारी सिंदेवाहीतून प्रारंभ झाली.

Fighters' struggle for debt relief for farmers | शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आमदारांची संघर्ष यात्रा

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आमदारांची संघर्ष यात्रा

Next

आमदारांचा वाढता सहभाग : टॅ्रव्हल्स आणि कारमधून सुरू झाला प्रवास
चंद्रपूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकरी सन्मानासाठी निघालेली विरोधी पक्षातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांची किसान कर्जमुक्ती संघर्ष यात्रा बुधवारी सिंदेवाहीतून प्रारंभ झाली. एक टॅ्रव्हल्स, कार आणि प्रचार रथाचा लवाजमा असलेली ही यात्रा प्रथमच विदर्भातून निघाली असल्याने प्रारंभाला चैतन्याचे वातावरण पहावयास मिळाले.
नागपूर मार्गे आमदारांचा ताफा नागभीडमध्ये पोहचल्यावर सकाळी ११ वाजता या यात्रेला रितसर सुरूवात झाली. प्रारंभी १२ आमदारच पोहचले होते. त्यानंतर हा आकडा वाढत जावून १९ वर पोहचला. त्यानंतर ही संख्या २२ वर गेली. चंद्रपुरात यात्रा पोहचली तेव्हा ट्रव्हल्स बसमधील ४० आसने पूर्णत: भरली होती. काही आमदार कारने यात्रेत सहभागी झाले होते.
चंद्रपुरात ही यात्रा पोहचल्यावर स्थानिक जनता कॉलेज चौकात माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी स्वागत केले. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक आमदारांनी वाहनाखाली उतरून त्यांच्या स्वागताचा स्विकार केला.
त्यानंतर याच वाहनात बसून नरेश पुगलिया घुग्घुस मार्गावरील अहमद लॉनवरील कार्यक्रम स्थळी गेले. मात्र त्यानंतर लगेच माघारी वळले. तिथे झालेल्या पत्रकार परिषदेनंतर हा ताफा घुग्घुस-वणी मार्गे यवतमाळकडे मार्गस्थ झाला. या यात्रेत राज्यभरातील विरोधी आमदारांचा सहभाग असून सिंदेवाही ते पनवेल अशी ही यात्रा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

कानपा येथे नेत्यांचे मार्गदर्शन
नागभीड: दरम्यान, या संघर्ष यात्रेचे चंद्रपूर जिल्ह्याच्या सिमेवरील कापना येथे जंगी स्वागत करण्यात आले. आगमन होताच चिमूरचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, जि.प.चे गटनेते डॉ. सतिश वारजुकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पं.स. उपसभापती प्रफुल्ल खापर्डे, पं.स. सभापती रवी देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, उपाध्यक्ष अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माधव बिरजे, कृउबास सभापती घनशश्याम डुकरे, नागभीडचे माजी उपसभापती दिनेश गावंडे यांनी पक्षाचे दुपट्टे व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तत्वपूर्वी या ठिकाणी सभा झाली. सभेला नागभीड व चिमूर तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाईच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती होती. यात आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, डॉ. सतिश वारजुकर, पंजाबराव गावंडे, गोविंद भेंडारकर यांचा समावेश होता.

मूल शहरात जंगी स्वागत
मूल: मूल शहरातील गांधी चौकात दुपारी १ वाजता यात्रेचे आगमन झाले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अजित पवार यांनी शेतकऱ्यांवरील असलेल्या कर्जातून मुक्ती झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, यासाठी शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. १९ आमदारांचे निलबं करणाऱ्या सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे यासह विविध घोषणा कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मार्लापण करुन नेतेमंडळींनी कार्यकर्त्याशी चर्चा केली. यावेळी पं. स. सदस्य संजय मारकवार, कृऊबासचे सभपती तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, उपसभापती संदीप कारमवार, माजी सभापती राकेश रत्नावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार, शहराध्यक्ष गंगाधर कुनघाडकर, जिल्हा सचिव गुरुदास गिरडकर, नगरसेवक विनोद कामडी, किशोर घडसे, राजेंद्र कन्नमवार, माजी नगरसेक बाबा अझीम, माजी सरपंच संजय फुलझेले आदी उपस्थित होते.

Web Title: Fighters' struggle for debt relief for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.