ब्रम्हपुरी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:28 AM2021-09-03T04:28:53+5:302021-09-03T04:28:53+5:30

जि. प. सदस्या दीपाली मेश्राम यांची पोलिसांत तक्रार ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी नगरपरिषदेने शहरात खनिज निधीअंतर्गत पाणी पुरवठा पाईपलाईनचे काम ...

File a case against the head of Bramhapuri Municipality | ब्रम्हपुरी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

ब्रम्हपुरी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

Next

जि. प. सदस्या दीपाली मेश्राम यांची पोलिसांत तक्रार

ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी नगरपरिषदेने शहरात खनिज निधीअंतर्गत पाणी पुरवठा पाईपलाईनचे काम मोठ्या जोमाने सुरू केले आहे. शहरालगत खेडमक्ता ही स्वतंत्र ग्रामपंचायत असून, त्या हद्दीत केलेले खोदकाम अनधिकृत असल्याने जि. प. सदस्य दीपाली मेश्राम यांनी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून मुख्याधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

ब्रम्हपुरी शहरात सुरू असलेल्या पाईपलाईनचे खोदकाम करण्याअगोदर संबंधित विभागाकडून रीतसर परवानगी घेण्यात आली नाही. खेडमक्ता ग्रामपंचायत पालिकेच्या हद्दीत नसतानासुद्धा पाणी पुरवठा पाईपलाईनचे अनधिकृत खोदकाम सुरू आहे. खोदकाम करताना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सूचना फलक, बॅरिकेट्स, इतर कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाही. या खोदकामामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दीपाली मेश्राम येथून जात असताना खोदकाम करणाऱ्या कामगारांना विचारले असता मुख्याधिकारी यांचा आदेश असल्याचे सांगितले. यावेळी उपसरपंच दीपक देशमुख, शेखर बोरघरे, महेश सोनकुसरे उपस्थित होते. काही वेळातच मुख्याधिकारी मंगेश वासेकर त्या ठिकाणी पोहोचले. दीपाली मेश्राम या लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित असतानासुद्धा जोरजोराने शिवीगाळ करून ते कोणाचेही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अशा बेजबाबदार मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी दीपाली मेश्राम यांनी पोलीस निरीक्षक यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत केली आहे.

कोट

हे खोदकाम गुरुवारी सुरू करण्यात आले होते आणि ते खोदकाम पूर्ण बुजविण्याचेसुद्धा काम करणार होते; पण उपसरपंचांनी येऊन कामात अडथळा निर्माण केला. त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्यसुद्धा उपस्थित होत्या. कुठल्याही प्रकारची शिवीगाळ करण्यात आली नाही. उलट उपसरपंचच एकेरी शब्दाचा वापर करून कामगारांना बोलत होता.

-मंगेश वासेकर, मुख्याधिकारी,

नगरपरिषद ब्रम्हपुरी.

020921\img-20210902-wa0102.jpg

खेडमक्ता हद्दीतील या रस्त्यावर पाईप लाईन साठी खोदला आहे.

Web Title: File a case against the head of Bramhapuri Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.