फाईल कॉम्पॅक्टरचे उद्घाटन
By admin | Published: August 25, 2014 11:53 PM2014-08-25T23:53:27+5:302014-08-25T23:53:27+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभिलेख कक्षात बसविण्यात आलेल्या आॅटोमॅटिक फाईल कॉम्पॅक्टर मशिनचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले.
चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभिलेख कक्षात बसविण्यात आलेल्या आॅटोमॅटिक फाईल कॉम्पॅक्टर मशिनचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व अभिलेखे सुरक्षित साठविण्यासाठी तीन अॅटोमॅटिक फाईल कॉम्पक्टर अभिलेख कक्षात बसविण्यात आले. एका फाईल कॉम्पॅक्टरमध्ये अंदाजे दिड हजार फाईल साठविल्या जातात. हे कॉम्पॅक्टर अॅटोमॅटिक असल्यामुळे ज्या फाईलची आवश्यकता आहे. त्या फाईलची कमांड कॉम्प्युटरला देताच फाईल तात्काळ उपलब्ध होते. ही आधुनिक पद्धती जिल्हाधिकारी कार्यालयात बसविण्यात आल्यामुळे फाईल शोधने सुलभ होणार आहे.
वीज पुरवठा खंंडित झाल्यावरसुद्धा हे कॉम्पॅक्टर काम करत असल्यामुळे फाईल शोधण्याच्या कामात अडथळा येणार नाही. त्याचप्रमाणे मॅन्युअलीसुद्धा फाईल शोधण्याची सोय या मशिनमध्ये देण्यात आली आहे. अशा प्रकारचे कॉम्पॅक्टर प्रत्येक तहसील कार्यालयात बसविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग व तहसीलदार विलास वानखेडे उपस्थित होते.(नगर प्रतिनिधी)