समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:24 AM2018-08-20T00:24:49+5:302018-08-20T00:25:34+5:30

९ आॅगस्ट क्रांतीदिनी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर युथ फॉर इक्वॉलिटी तथा आझाद सेना या राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित मनुवाद्यांनी भारतीय संविधानाची प्रत फाडून जाळल्या होत्या. यावेळी विषमतावादी मानवद्रोही मनुस्मृती लागू करण्याची मागणी करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक तथा मागासर्गीयांच्या आरक्षण व अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट विरोधात घोषणा दिल्या.

Filing sedition charges | समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ९ आॅगस्ट क्रांतीदिनी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर युथ फॉर इक्वॉलिटी तथा आझाद सेना या राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित मनुवाद्यांनी भारतीय संविधानाची प्रत फाडून जाळल्या होत्या. यावेळी विषमतावादी मानवद्रोही मनुस्मृती लागू करण्याची मागणी करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक तथा मागासर्गीयांच्या आरक्षण व अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट विरोधात घोषणा दिल्या. या समाजकंटकांवर देशद्रोहाच्या गुन्ह्या दाखल करुन अटक करण्याची मागणी चंद्रपुरातील विविध संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदन देणाºया शिष्टमंडळात वंचित बहुजन आघाडीने रविंद्र उमाठे, अंकुश वाघमारे, राष्टीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे हाजी अनवर अली, अ‍ॅड. रफीक शेख, फिरोजखान पठाण, भारिपचे खुशाल तेलंग, सुरेश नारनवरे, संतोष डांगे, भैय्या मानकर, जास्वंती माहुरीकर, ऋचा लोणारे, अ‍ॅड. शंकरराव सागोरे, आदिवासी महासभेचे प्रा. नामदेव कन्नाके, सत्यशोधक समाज संघटनेचे किशोर पोतनवार, हिराचंद बोरकुटे आदी उपस्थित होते.
संयुक्त समितीतर्फे निषेध
समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर समिती, सर्व आंबेडकरी समाज, विविध संघटना, जनआंदोलन समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने सदर घटनोचा निषेध करीत जिल्हाधिकारीत तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांंना निवेदन देत कठोर करावाई करण्याची मागणी केली. यावेळी भदंत कुपाशरण महाथेरो, अशोक निमगडे, विशलचंद अलोणे, राजू खोब्रागडे, रामसिंह सोहल, बाजीराव उंदिरवाडे, पप्पु देशमूख, प्रतिक डोर्लीकर, स्नेहल रामटेके, अशोक ठेंबरे, मृणाल कांबळे, सुलभ खोबरागडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Filing sedition charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.