पोटाची खळगी भरण्यासाठी थाटला शेतातच संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:55 PM2018-02-11T23:55:50+5:302018-02-11T23:56:17+5:30

उपाशी पोट माणसाला स्वस्थ बसू देत नाही. पोटासाठी त्याला कुठली ना कुठली तडजोड करावी लागते. टिचभर पोटासाठी स्वत:चे घरदार सोडून रोजगाराच्या शोधात आलेल्या कुटुंबीयांनी शेतातच संसार थाटला आहे.

To fill the abdominal stomach, the world is in the field | पोटाची खळगी भरण्यासाठी थाटला शेतातच संसार

पोटाची खळगी भरण्यासाठी थाटला शेतातच संसार

Next
ठळक मुद्देजीवापाड मेहनत : घरदार सोडून कामासाठी भटकंती

प्रकाश काळे ।
आॅनलाईन लोकमत
गोवरी: उपाशी पोट माणसाला स्वस्थ बसू देत नाही. पोटासाठी त्याला कुठली ना कुठली तडजोड करावी लागते. टिचभर पोटासाठी स्वत:चे घरदार सोडून रोजगाराच्या शोधात आलेल्या कुटुंबीयांनी शेतातच संसार थाटला आहे.
तेलंगणा राज्यातील भगवान भटकाळी रा. रुपापूर व अंकूश जाधव हे आदिलाबाद जिल्ह्यातील एकाच गावातील रहिवासी तर मनोहर दुबळे हा जिवती तालुक्यातील टेकेझरी या गावाचा. गावाकडे रोजगाराची सोय नाही. दिवाळीनंतर गावाकडे रोजगार मिळत नाही. त्यामुळे पोटाची मारामार होते. कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यामुळे रोजगाराची सोय म्हणून गावोगावी रोजगार शोधावा लागतो, असे त्यांचे म्हणणे आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी येथील अमित रणदिवे व सुमीत रणदिवे या दोन भावंडानी त्यांना राहण्यासाठी शेतातच सोय करुन दिली आहे. कापूस वेचून दिवसाकाठी जे मजुरी मिळते, त्या मजुरीवरच ते कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. अंकुश जाधव व मनोहर दुबळे यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. घरी जमिनीचा कोरभर तुकडाही नाही. त्यामुळे त्यांना रोजगार केल्याशिवाय कोणताच पर्याय नाही. भगवान भटकाळी यांची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. गावाकडे रोजगाराची कोणतीच सोय नसल्याने त्यांना रोजगार मिळविण्यासाठी नेहमीच भटकंती करावी लागते. लहान मुलाबाळांना व म्हाताºया आईवडीलांना घरीच सोडून हे कुटुंब रोजगारासाठी गोवरी येथे आले आहे. आम्ही शेतातच राहतो. आम्हाला फक्त रोजगार मिळवून द्या, असा त्यांचा केविलवाणा टाहो आहे. काम संपल्यावर पुन्हा त्यांना आम्हाला दुसºया गावाला रोजगार शोधात जावे लागणार असल्याची खंत अंकुश जाधव याने बोलून दाखविली.ऊन्ह, वारा, थंडीची जराहा जमा न बाळगता टिचभर पोटासाठी शेतातच केविलवाणा संसार थाटून त्यांची चाललेली धडपड संघर्षाचे जिणे समाजमन सुन्न करणारे आहे.
नशिबात संघर्षाचेच जिणे
गावाकडे रोजगार मिळत नाही. रोजगाराचा शोधात नेहमीच भटकंती करावी लागते. काम केले नाही तर उद्याची चूल पेटणार कशी ? त्यामुळे काम केल्याशिवाय आम्हाला कोणताच पर्याय नाही, अशी खंत या कुटुंबीयांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

Web Title: To fill the abdominal stomach, the world is in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.