गल्लो-गल्लीतील खड्डे बुजवा, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:20 AM2021-07-16T04:20:03+5:302021-07-16T04:20:03+5:30
बल्लारपूर : मागील दोन वर्षांपासून बल्लारपूर शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारा प्रत्येक वॉर्डातील गल्लो-गल्लीत खड्डे खोदून पाईप टाकून घराला कनेक्शन ...
बल्लारपूर : मागील दोन वर्षांपासून बल्लारपूर शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारा प्रत्येक वॉर्डातील गल्लो-गल्लीत खड्डे खोदून पाईप टाकून घराला कनेक्शन देणे सुरू आहे. परंतु त्या खोदलेल्या खड्ड्यावर सिमेंट किंवा पेव्हर्स लावून बुजविण्यात आले नाही. त्यामुळे वॉर्डातील लोकांना पावसाळ्याच्या दिवसात त्रास होत आहे. ते खोदलेले खड्डे त्वरित बुजवावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पक्षातर्फे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना देण्यात आले आहे.
मजिप्राने पाईपलाईन टाकून दोन वर्षाचा कालावधी उलटला. परंतु खड्डे बुजविण्यात आले नाहीत. यामुळे रात्री-बेरात्री आवागमन करणाऱ्यांना त्रास होत आहे. शहरातील सर्वच वॉर्डात सिमेंटचे रस्ते तोडून हे काम करण्यात आले. ते त्वरित जैसे थे करण्यात यावे. नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. निवेदन देताना आप पक्षाचे जिल्हा विधी सल्लागार ॲड. किशोर पुसलवार, शहर अध्यक्ष रवीकुमार पुप्पलवार, तसेच अफझल अली, आसिफ शेख, समशेरसिंग चौहान, राकेश वडस्कर, उमेश काकडे, अवधेश तिवारी, सुधाकर गेडाम, कृष्णा मिश्रा, शुभम जगताप यांची उपस्थिती होती.
150721\img-20210714-wa0012.jpg
मुख्याधिकारी यांना निवेदन देताना कार्यकर्ते