अखेर चंद्रपूर मनपाच्या अर्थसंकल्पावर मंजुरीची मोहोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:29 AM2021-03-27T04:29:27+5:302021-03-27T04:29:27+5:30
अर्थसंकल्पीय सभेत महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार, मुख्य लेखापरीक्षक मनोज गोस्वामी ...
अर्थसंकल्पीय सभेत महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार, मुख्य लेखापरीक्षक मनोज गोस्वामी आदींसंह गटनेते व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी सभापती रवी आसवानी यांनी अर्थसंकल्पातील विविध योजना व तरतुदींची माहिती दिली. मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार यांनी अर्थसंकल्पातील उत्पन्नाचे स्त्रोत व खर्चाचा तपशील मांडला. महापौर राखी कंचर्लावार म्हणाल्या, अर्थसंकल्पात चंद्रपूरकरांवर कोणत्याही कराचा बोदा लादला नाही. गरजू नागरिकांच्या आरोग्यासाठी फिरत्या रुग्णालयाची संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ७५ लाखांची तरतूद केल्याचे सांगितले. चर्चेदरम्यान विरोधी नगरसेवकांनी अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत टीका सुरू असतानाच, मंजुरी प्रदान करण्यात आली. शहर विकासासाठी काहीच नवीन योजना नाही. शिवाय, करवाढीची वस्तुस्थिती लपवल्याचा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख व अन्य नगरसेवकांनी केला आहे.
शिक्षणासाठी शून्य तरतूद
अर्थसंकल्पात मनपा शाळा व स्मशानभूमी विकासासाठी तरतूद नसल्याचा आरोप नगरसेविका सुनीता लोढीया यांनी सभागृहात केला. वर्दळीच्या मार्गावर मांस-मटणाची दुकाने आहेत, यासाठी शेल्टर होम उभारावे, रस्ते, पूल व खांबांवर जाहिराती चिकटविण्याच्या घटना वाढल्याने आळा घालावा, निवासी घरांची परवानगी घेऊन व्यावसायिक कामांसाठी वापरणाऱ्यांकडून चेंज ऑफ युज म्हणून दंड आकारावा, गुंठेवारी प्रकरणे निकाली काढल्यास मनपाचे उत्पन्न वाढू शकते, याकडेही नगरसेविका लोढीया यांनी लक्ष वेधले.