अखेर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:07 PM2018-10-12T23:07:15+5:302018-10-12T23:07:41+5:30

वरोरा ते करनुल (तेलंगणा) व वरोरा ते राजनांदगाव (छत्तीसगढ) ७६५ के.व्ही.डी.सी. ट्रॉन्समिशन लाईनमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसाई भरपाई देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपण शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारपासून उपोषणाला बसलो होतो.

Finally the demands of the farmers are valid | अखेर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य

अखेर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य

Next
ठळक मुद्देबाळू धानोरकर : दिले लेखी आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वरोरा ते करनुल (तेलंगणा) व वरोरा ते राजनांदगाव (छत्तीसगढ) ७६५ के.व्ही.डी.सी. ट्रॉन्समिशन लाईनमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसाई भरपाई देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपण शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारपासून उपोषणाला बसलो होतो. मात्र शुक्रवारी या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी लिखित स्वरुपात दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची आल्याची माहिती आ. सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आ. धानोरकर म्हणाले, जिल्ह्यात सुरू असलेल्या टॉवर लाईन कामाच्या सद्यस्थितीबाबत आयोजित बैठकीत उपविभागीय अधिकारी समितीकडून मुल्यांकन करून संबंधित शेतकऱ्यांना जागेचा अंदाजित मोबदला देण्याचे ठरले होते. या बैठकीच्या कार्यवृत्ताला केराची टोपली दाखविण्यात आली.
पॉवर ग्रीड तथा इतर कंपन्यांमार्फत उभारण्यात टॉवरचे बांधकाम वा टॉवरची उभारणी करीत असताना शेतकºयांच्या पिकांचे नुकसान होत असते. तसेच शेजारच्याही शेतकºयांचे नुकसान होत असते. सदर शेतकºयांनादेखील शेतपिकाचा योग्य मोबदिला देण्याचे कंपनीने मान्य केले. अशा सर्व बाधित शेतकºयांची प्रकरणे निकाली काढून मोबदला निश्चित करून आपल्या स्तरावर मोबदला देण्यात यावा, अशी मागणी आपण प्रशासनाकडे केली होती. ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. याशिवाय टॉवर उभारणीच्या वेळेस पिकांचे नुकसान, लाईन ओढताना (दोन लाईनच्या मधील) पिकांचे नुकसान, लाईन व टॉवरमधील कॉरीडोअरच्या मध्ये येणाऱ्या झाडांचे नुकसान, यावर भरपाई मिळवून देण्याचे आश्वासनही देण्यात आल्याचे आ. धानोरकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, सतीश भिवगडे, सुरेश पचारे आदी उपस्थित होते.

Web Title: Finally the demands of the farmers are valid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.