अखेर जिल्ह्याला मिळाले २०० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:28 AM2021-05-13T04:28:26+5:302021-05-13T04:28:26+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना आरोग्यसुविधा अपुऱ्या पडू नयेत, यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे दर आठवड्यात आढावा ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना आरोग्यसुविधा अपुऱ्या पडू नयेत, यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे दर आठवड्यात आढावा घेऊन आरोग्य यंत्रणेला सूचना देत आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांवर वेळेवर उपचार होण्यासाठी विविध उपाययोजनांमध्ये वाढ करण्यात आली आहे. कोविड रुग्णांसाठी ब्रह्मपुरी, सावली व सिंदेवाही येथे मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. तालुकास्थळी ऑक्सिजन प्लांट निर्मिती, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा, बेड्सची संख्या वाढविणे, औषधी व रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटरची पाहणी करून रुग्णांच्या अडचणी जाणून घेत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा जागरूक होऊन कर्तव्य बजावत आहे. गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची गरज निर्माण झाली असता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने मंजुरी देऊन २०० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर उपलब्ध करून दिले.
कोणत्या तालुक्याला किती ?
जिल्ह्यासाठी मिळालेल्या २०० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरमधून ब्रह्मपुरी तालुका ३०, सावली १५ सिंदेवाही १५, गोंडपिपरी १०, कोरपना १५ गडचांदूर १५, भद्रावती १५, मूल १५, वरोरा १५ चिमूर १०, नागभीड १०, बल्लारपूर १५ तसेच चंद्रपूर तालुका ३० अशा प्रकारे १० लीटर क्षमतेचे २०० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर उपलब्ध करून दिले.