अखेर वन अकादमीत सुरू झाले १०० ऑक्सिजनयुक्त बेड्सचे कोविड रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:30 AM2021-05-11T04:30:01+5:302021-05-11T04:30:01+5:30
यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त ...
यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, निवासी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, नोडल अधिकारी रोहन घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, बांधकाम विभागाचे राठोड, माजी नगरसेवक बलराम डोडानी, अजय जयस्वाल, विश्वजित शाहा, जितेश कुळमेथे, कलाकार मल्लारप, अमोल शेंडे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, ऑक्सिजनयुक्त बेड्स मिळत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदार निधीतून एक कोटी खर्च करण्याची परवानगी दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांनी हा निधी मनपाकडे वळता केला होता. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने प्रशासकीय मान्यता दिली. या रुग्णालयासाठी स्थानिक उद्योगांनीही सामाजिक दायित्व निधी उपलब्ध करून त्यामुळे अल्पावधीतच कोविड रुग्णालयाचे काम पूर्ण झाले. सोमवारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रुग्णालयाचे लोकार्पण केले. कोविड रुग्णांसाठी आरोग्य सुविधा कदापि कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री विजय वडेट्टीवार दिली. निर्सगाच्या सान्निध्यात वसलेले हे रुग्णालय लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या प्रबळ इच्छाशक्तीचे उत्तम उदाहरण असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. अतिशय अल्प कालावधीत कोविड रुग्णालय सुरू केल्याबद्दल खासदार बाळू धानोरकर यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची प्रशंसा केली.
असे आहे रुग्णालय
कोविड रुग्णालयात ११५ बेड्स आहेत. यामध्ये १०० ऑक्सिजनयुक्त बेड्सची व्यवस्था आहे. प्रत्येक वाॅर्डात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. तक्रार निवारण कक्षही तयार करण्यात आला. रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ नये, यासाठी ऑक्सिजन टँक बसविण्यात आला. या रुग्णालयात सुमारे १५० बेड्स ठेवण्याची क्षमता आहे. येत्या काही दिवसात अतिदक्षता विभागही सुरू होणार आहे.
कोट
वन अकादमीतील कोविड रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे. आमदार निधीतून साकारलेले हे जिल्ह्यातील हे पहिलेच कोविड रुग्णालय ठरले. रुग्णालयात येणाऱ्या सर्व रुग्णांना आरोग्य पथकाने सन्मानजनक वागणूक व रुग्णांच्या प्रकृतीची माहिती कुटुंबीयांना वेळोवेळी द्यावी.
-किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर