अखेर सिंदेवाही येथील शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:44 AM2020-12-15T04:44:23+5:302020-12-15T04:44:23+5:30
सिंदेवाही : मार्च महिन्यांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. ९ ते १२ पर्यंतची शाळा सुरु करण्याचे निर्देश शासनाने दिले ...
सिंदेवाही : मार्च महिन्यांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. ९ ते १२ पर्यंतची शाळा सुरु करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र येथील काही शिक्षक कोरोनाबाधित आढळून आल्याने सिंदेवाही येथील सर्वोदय विद्यालय व कन्या विद्यालय सोमवारपासून प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत सुरू करण्यात आली.
२३ नोव्हेंबरपासून ९ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. यावेळी सर्व शिक्षकांची व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. दरम्यान सिंदेवाही येथील काही शाळा सुरु झाल्या होत्या. परंतु, काही शाळेतील शिक्षक कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे शाळा पुन्हा कालावधीसाठी बंद करण्यात आल्या. त्यानंतर दहावीची परीक्षा आली. त्यामुळे येथील सर्वोदय विद्यालय व कन्या विद्यालयाल सोमवारी प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत सुरु करण्यात आले. यावेळी मास्क बांधून, सॅनिटायझरने हात स्वच्छ धूवून ऑक्सिजन तपासणी करुनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला.